Mukesh Ambani Deal: मुकेश अंबानींच्या डीलनंतर या चाॅकलेट कंपनीचे शेअर्स अधिक गोड, अप्पर सर्किट कायम
Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून या चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे, स्टॉकमध्ये गेले महिनाभर अप्पर सर्किट्स कायम आहे. आज या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.
Mukesh Ambani Deal : लोटस चॉकलेट कंपनीचे (लोटस) शेअर्स सतत अपर सर्किटवर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशी झालेल्या करारानंतर या चॉकलेट कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटला धडकत आहेत. सोमवारी, १६ जानेवारीला लोटस कंपनीच्या समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
ट्रेंडिंग न्यूज
दोन आठवड्यांपूर्वी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने लोटस चॉकलेट कंपनीसोबत मोठा करार जाहीर केला होता. त्यानंतर लोटसच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
१६ व्या दिवशी अप्पर सर्किट
लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सनी सलग १६ व्या दिवशी उच्चांक गाठला. गेल्या एका महिन्यात या शेअर्सनी १०० टक्क्यांपेक्षा जास्त उच्चांकी पातळी गाठली आहे. लोटस आइस्क्रीम कव्हरिंग्स कोको डेरिव्हेटिव्ह्ज आणि चॉकलेट उत्पादने (शुद्ध चॉकलेट तसेच कंपाऊंड प्रकार दोन्ही) च्या उत्पादन, व्यापार, विक्री, आयात आणि निर्यात या व्यवसायात अग्रेसर आहे.
रिलायन्ससोबत करार
गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, कंपनीच्या शेअर्सने अपर सर्किट गाठले होते आणि शेअर्सची किंमत १९९.९५ वर पोहोचली होती. यानंतर, आज पुन्हा त्याच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी नोंदवली गेली आणि त्याला अप्पर सर्किट लागले. डिसेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात, रिलायन्स रिटेलने या चॉकलेट कंपनीचे ५१ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली होती. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळत आहे.
ईशा अंबानीने रिलायन्स रिटेल वेंचर्सची जबाबदारी स्विकारली आहे यासह रिटेल सेक्टरमध्ये मुकेश अंबानीं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करत आहेत, रिलायन्स रिटेल आणि लोटस चाॅकलेटदरम्यान ८.९४ दशलक्ष डाॅलर्ससाठी करार करण्यात आला आहे. या करारासाठी ११३ रुपये प्रती शेअर्सचा भाव निश्चित करण्यात आला आहे. चाॅकलेट कंपनी लोटसची स्थापना १९८८ मध्ये झाली होती. ही कंपनी कोका आणि चाॅकलेट उत्पादनाचा पुरवठा करते.
संबंधित बातम्या