मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola: मोटोरोलाचा ‘हा’ नवा फोन धुमाकूळ घालणार; कमी किंमतीत मिळणार तगडे फीचर्स!

Motorola: मोटोरोलाचा ‘हा’ नवा फोन धुमाकूळ घालणार; कमी किंमतीत मिळणार तगडे फीचर्स!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 02, 2024 01:59 PM IST

Motorola Upcoming Smartphones: लवकरच मोटोरोला कंपनीचा बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

 Motorola Smartphone
Motorola Smartphone

Motorola New Smartphones: ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मोटोरोला त्यांचे आगामी स्मार्टफोन मोटो जी२४ पॉवर, मोटो जी ३४ 5G आणि मोटो जी ०४ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. हे फोन कधी लॉन्च केले जातील, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, मोटो जी ०४ स्मार्टफोन नुकताच UAE TDRA सर्टिफिकेशन्सवर पाहिला गेला. यावरून हा फोन लवकरच बाजारात दाखल होईल, अशी शक्यता आहे. सर्टिफिकेशनमध्ये या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, लीक झालेल्या माहितीत या फोनबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

लीक झालेल्या माहितीनुसार, कंपनी या फोनमध्ये ६.५६ इंचाचा डिस्प्ले देऊ शकते, जो ९० Hz रिफ्रेश रेटसह येतो. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन युरोपिअन रिटेलरच्या वेबसाईटवर पाहिला गेला. या लिस्टिंगनुसार, हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा देण्यात येणार आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी १० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. बायोमेट्रिक सेक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड- माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. महत्त्वाचे म्हणजे, या फोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

लॉन्च होण्यापूर्वीच डमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोनचे फीचर्स लीक

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी त्यांचा आगामी स्मार्टफोन रेडमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोनवर काम करत असल्याची माहिती समोर आली. हा स्मार्टफोन पुढच्या वर्षी भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने या वर्षी ऑगस्ट महिन्यात रेडमी के ६० स्मार्टफोन लॉन्च केला होता, त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच गेल्या नोव्हेंबरमध्ये रेडमी के ७० अल्ट्रा लॉन्च केला. रेडमीच्या के सीरिज स्मार्टफोनमध्ये रेडमी के ७०, रेडमी के ७० प्रो आणि रेडमी के ७० ई यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

WhatsApp channel

विभाग