Motorola: बजेट आणि मिड-रेंजमध्ये मोटोरोला आणतोय 'हे' दोन धमाकेदार फोन, जाणून फीचर्स आणि किंमत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola: बजेट आणि मिड-रेंजमध्ये मोटोरोला आणतोय 'हे' दोन धमाकेदार फोन, जाणून फीचर्स आणि किंमत

Motorola: बजेट आणि मिड-रेंजमध्ये मोटोरोला आणतोय 'हे' दोन धमाकेदार फोन, जाणून फीचर्स आणि किंमत

Updated Oct 28, 2024 08:22 PM IST

Motorola Upcoming Smartphones: मोटोरोला लवकरच आपला बजेट आणि मिड रेंजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे, अशी माहिती लीक झाली आहे.

लवकरच बाजारात येतायेत मोटोरोलाचे हे दोन फोन!
लवकरच बाजारात येतायेत मोटोरोलाचे हे दोन फोन!

Motorola Budget and Mid-Range Smartphone: स्मार्टफोन कंपनी मोटोरोला आपल्या बजेट आणि मिड बजेट रेंजमध्ये सतत नवनवीन फोन जोडत असते. लीक झालेल्या माहितीनुसार, मोटोरोला दोन नवीन जी-सीरिज फोन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. या सीरिजमध्ये मोटो जी ०५ आणि मोटो जी १५ हे दोन फोन आहेत. या फोनमध्ये मिळणारे फीचर्स आणि किंमतीबाबत जाणून घेऊयात.

टिप्सटर सुधांशू अंबोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटो जी ०५ च्या ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १४० युरो (सुमारे १२,७३२.७५ रुपये) आणि ४ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १७० युरो (सुमारे १५,४६१.१९ रुपये) असेल.

दरम्यान, मोटो जी १५ (८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज) ची किंमत २०० युरो (अंदाजे १८ हजार १८९ रुपये) आहे. मोटोचे दोन्ही फोन पुढील महिन्यात युरोपमध्ये लॉन्च होणार आहेत. हा फोन भारतात कधी उपलब्ध असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. भारतात या फोनची किंमत वेगवेगळी असू शकते. भारतात मोटो जी १४ भारतात ९ हजार ९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. मोटो जी १५ बद्दल आणखी काही माहिती समोर आली आहे.

मोटो जी १५: संभाव्य स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला नवा फोन मोटो जी १५ मध्ये ४ जीबी रॅम मिळण्याची शक्यता आहे. या मॉडेलमध्ये ४ जीबी रॅम असून अँड्रॉइड १५ सॉफ्टवेअरवर चालतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर चिपसेट आहे, चिप माली-जी ५२ एमसी २ जीपीयूसह येतो. मोटो जी १४ मध्ये युनिसॉक टी ६१६ प्रोसेसर आहे. यात ऑक्टा-कोर चिप देण्यात आली आहे.

मोटोरोला एज ५० प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी

फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेल्या मोटोरोला एज ५० प्रो या मोटोरोला फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सेलमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजअसलेला हा फोन २९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत १ हजार २५० रुपयांपर्यंत कमी करू शकता. हा फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. फोनवर २८ हजार ३०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील दिला जात आहे. लक्षात ठेवा एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. हा सेल ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलसेल्फी कॅमेरा आणि १२५ वॉट चार्जिंगसह अनेक उत्तम फीचर्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊया याच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल.

Whats_app_banner