Motorola Smartphone: जर तुम्ही मोटोरोलाचे फॅन असाल आणि परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स असलेला फोन मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या तीन दमदार फोनबद्दल सांगत आहोत. या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे यातील सर्वात स्वस्त फोन ६ हजार ९९९ रुपयांचा आहे. या डिव्हाइसमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलपर्यंतचा मेन कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला १२० हर्ट्झपर्यंतच्या रिफ्रेश रेटचा डिस्प्लेही मिळेल.
मोटोरोला जी ०४
मोटोरोला जी०४ च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. मोटोरोलाच्या या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. रॅम बूस्ट फीचरच्या मदतीने फोनची एकूण रॅम ८ जीबीपर्यंत आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये युनिसॉक टी ६०६ ऑफर करत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल चा आहे. दमदार साउंडसाठी फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस देखील मिळेल. फोनची बॅटरी ५००० एमएएच ची आहे. ही बॅटरी २० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.
मोटोरोला ई२२
मोटोरोला ई२२ च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत फ्लिपकार्टवर ८ हजार ९९९ रुपये आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हे आयपीएस एलसीडी पॅनेल ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी३७ चिपसेट देत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय यात २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.
हा फोन फ्लिपकार्टवर ९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. फोनमध्ये कंपनी ६.५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला एक शानदार अल्ट्रा प्रीमियम व्हेगन लेदर डिझाइन पाहायला मिळणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ वर काम करतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी कंपनी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनची बॅटरी ५००० एमएएच ची आहे. दमदार साउंडसाठी कंपनी या फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर्ससह ड्युअल डॉल्बी अॅटमॉस देत आहे.