Motorola: एआय फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा; मोटोरोलाचे ‘हे’ दोन वॉटरप्रूफ फोन नव्या रंगामध्ये लॉन्च!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola: एआय फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा; मोटोरोलाचे ‘हे’ दोन वॉटरप्रूफ फोन नव्या रंगामध्ये लॉन्च!

Motorola: एआय फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा; मोटोरोलाचे ‘हे’ दोन वॉटरप्रूफ फोन नव्या रंगामध्ये लॉन्च!

Dec 06, 2024 04:42 PM IST

Motorola New Smartphones: मोटो मोटोरोला रेजर ५० अल्ट्रा मोटोरोला एज ५० निओच्या नवीन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

एआय फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा; मोटोरोलाचे ‘हे’ दोन वॉटरप्रूफ फोन नव्या रंगामध्ये लॉन्च!
एआय फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा; मोटोरोलाचे ‘हे’ दोन वॉटरप्रूफ फोन नव्या रंगामध्ये लॉन्च!

Motorola Smartphones:  मोटोरोलाने फ्लॅगशिप मोटोरोला रेजर ५० अल्ट्रा आणि मोटोरोला एज ५० निओ नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे स्मार्टफोन आता पॅन्टोनच्या २०२५ कलर ऑफ द इयर, 'मोचा मूस' रंगात उपलब्ध होतील. मोटो रेजर ५० अल्ट्रा क्लॅमशेल डिझाइन केलेला फोन पीच फुझ, मिडनाइट ब्लू आणि स्प्रिंग कलरमध्ये लॉन्च करण्यात आला. एज ५० निओ भारतात लाटे, ग्रिसेल, नॉटिकल ब्लू आणि पोइनसियाना रंगात लॉन्च करण्यात आला. आता हे दोन्ही फोन मोचा मूस कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केले जाणार आहेत.

मोटोरोला रेजर ५० अल्ट्रा आणि एज ५० निओच्या नवीन पॅन्टोन १७-१२३० मोचा मूसे कलर व्हेरिएंटमध्ये बॅक पॅनेलवर टेक्सचर्ड फिनिशसह तपकिरी टोन देण्यात आला आहे. नव्या कलर व्हेरियंटची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी लवकरच तो जागतिक बाजारपेठेतील निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल, असे कंपनीने म्हटले आहे. फोनच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, कारण केवळ फोनचे कलर व्हेरियंट बदलले आहे. पॅन्टोन कलर ऑफ द इयर मॉडेल्स गेल्या वर्षी भारतात लॉन्च करण्यात आल्याने हे व्हर्जन भारतातही लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

मोटोरोला रेजर ५० अल्ट्रा भारतात १२ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटसाठी ९९ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. हा स्मार्टफोन आता अ‍ॅमेझॉनवर ७९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. दुसरीकडे, मोटोरोला एज ५० निओ ८ जीबी + २५६ जीबी मॉडेलची भारतात २३ हजार ९९९ रुपयांमध्ये घोषणा करण्यात आली होती. पण आता फ्लिपकार्टवरून हा फोन २१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

मोटोरोला रेझर ५०: स्पेसिफिकेशन्स

फोनची मुख्य स्क्रीन ६.९ इंच आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३,००० निट्सची पीक ब्राइटनेस आहे. रेझर ५० ला आयपीएक्स ८ रेटिंग देखील आहे, याचा अर्थ फोन पाणी आणि धुळीमुळे खराब होणार नाही. मोटोरोला रेझर ५० मध्ये ४,२०० एमएएचची दमदार बॅटरी आहे. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह १३ एमपी अल्ट्रावाइड प्लस मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटोरोला निओ ५०: स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये ६.४ इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. फोनमध्ये डायमेंसिटी ७३०० चिपसेटसह १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमध्ये ४,३१० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य लेन्स 50 मेगापिक्सेलचा असून यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (ओआयएस) फीचर देखील देण्यात आले आहे. यात १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि १० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

 

Whats_app_banner