मोटोरोला आपला नवीन पिढीचा क्लॅमशेल स्मार्टफोन रेजर ५० सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. बऱ्याच दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा सुरू असून आता अखेर मोटोरोला रेजर ५० सीरिजच्या लाँचिंगची तारीख समोर आली आहे. मोटोरोला रेजर ५० सीरिजसोबतच कंपनी चीनमध्ये मोटोरोला एस ५० निओ देखील लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या फिचर्सबाबत जाणून घेऊयात.
मोटोरोला रेजर ५० सीरिज आणि मोटोरोला एस ५० निओ २५ जून रोजी लॉन्च होणार आहेत, अशी कंपनीने वीबो पोस्टद्वारे अधिकृत घोषणा केली. प्रक्षेपण कार्यक्रम भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरू होईल. हे डिव्हाइस सध्या चीनमध्ये लॉन्च केले जात आहे. मात्र, हा स्मार्टफोन भारतात कधी दाखल होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
लीक आणि अफवांनुसार, मोटोरोला रेजर ५० मध्ये ६.९ इंचाचा पीओएलईडी मेन डिस्प्ले आणि ३.६ इंचाचा ओएलईडी कव्हर डिस्प्ले असण्याची शक्यताआहे. दोन्ही डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करतात. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० एक्स चिपसेट आणि ८ जीबी रॅम देण्यात येणार आहे. कायमस्वरूपी परफॉर्मन्ससाठी रेजर ५० मध्ये ४३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४ हजार २०० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या स्मार्टफोनची किंमत ४० हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मोटोरोला रेजर ५० अल्ट्रामध्ये ६.९ इंचाचा मुख्य ओएलईडी डिस्प्ले आणि २ इंचाचा कव्हर डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ चिपसेट असण्याची शक्यता आहे आणि यात ६८ वॅट चार्जिंग सपोर्टसह ४ हजार एमएएच बॅटरी असण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या