Motorola New Smartphones: स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने गेल्या आठवड्यात त्यांचा नवा 5G स्मार्टफोन मोटो जी ३४ भारतीय बाजारात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, गाहकांना कमी किंमतीत तगडे फीचर्स मिळत आहेत. ज्यामुळे हा स्मार्टफोन बाजारातील अनेक कंपन्यांना टक्कर देईल, असा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे.
हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या सेलला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन खास डिस्काऊंटसह अवघ्या १० हजारांत खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीची अधिकृत वेबसाईट किंवा प्लिपकार्टवरून या स्मार्टफोनची विक्री केली जाऊ शकते.
मोटो जी ३४ स्मार्टफोनची मूळ किंमत (४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) १० हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर, ८ जाबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनच्या खरेदीवर १००० रुपयांची एक्स्चेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर ग्राहकांना हा फोन अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांत खेरदी करता येणार आहे.
आयसीआयसीआयच्या बँकेतील ग्राहकांना हा फोन ईएमआय व्यवहारद्वारे खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हा स्मार्टफोन चारकोल ब्लॅक, आइस ब्लू आणि ओसन ग्रीन अशा तीन रंगात बाजारात उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस रिझोल्यूशनसह ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्ले मिळत आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 500nits पीक ब्राइटनेससह समर्थित आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आहे. मोटो जी ३४ च् ५ हजार एमएएच क्षमतेच्या बॅटरीला २० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला.