Motorola Razr 50: भल्यामोठ्या स्क्रीनसह मोटोरोलाचा फ्लिप स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत-motorola launches razr 50 flip style foldable in india check price offers ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola Razr 50: भल्यामोठ्या स्क्रीनसह मोटोरोलाचा फ्लिप स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

Motorola Razr 50: भल्यामोठ्या स्क्रीनसह मोटोरोलाचा फ्लिप स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

Sep 09, 2024 05:30 PM IST

Motorola Razr 50 Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने आज त्यांचा नवा फ्लिप फोन भारतात लॉन्च केला आहे.

 मोटोरोलाचा नवा फ्लिप फोन मोटोरोला रेझर ५० भारतात लॉन्च
मोटोरोलाचा नवा फ्लिप फोन मोटोरोला रेझर ५० भारतात लॉन्च

Motorola Razr 50 Launched In India: मोटोरोलाने आज आपला नवा फ्लिप फोन लॉन्च केला आहे. भारतात लाँच होणारा मोटोच्या रेजर सीरिजचा हा दुसरा फोल्डेबल आहे. तसेच हा फोन या सीरिजमधील सर्वात परवडणारा फोन आहे. मोटोरोला रेजर ५० मध्ये ६.९ इंचाचा मोठा डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन आणि व्हेगन लेदर फिनिश देण्यात आला आहे. दरम्यान, मोटोरोला रेजर ५० मध्ये ग्राहकांना कोणकोणती फीचर्स मिळतात, हे जाणून घेऊयात.

मोटोरोला रेजर ५० केवळ ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत ६४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. मोटोरोला या फोनवर लिमिटेड पीरियड फेस्टिव्ह डिस्काउंट ५००० रुपये देत आहे. यासोबतच काही बँक कार्डफोनवर १०००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. अशा प्रकारे ग्राहकांना १५ हजारांची सूट मिळाली तर हा फोन अवघ्या ४९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

मोटोरोला रेजर ५०: डिस्प्ले

या मोटो फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०+ आणि ३,००० निट्स पीक ब्राइटनेससह ६.९ इंचाचा पोलेड एफएचडी+ एमोलेड मेन डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये ३.६३ इंचाचा ओएलईडी एफएचडी+ अमोलेड कव्हर डिस्प्ले, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०, १७०० निट्स पीक ब्राइटनेस, फोन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येतो.

मोटोरोला रेजर ५०: प्रोसेसर

माली-जी६१५ एमसी२ जीपीयूसह मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० एक्स प्रोसेसर.

मोटोरोला रेजर ५०: रॅम आणि स्टोरेज

फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल.

मोटोरोला रेजर ५०: कॅमेरा

मोटोच्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड/मॅक्रो कॅमेरा, ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

मोटोरोला रेजर ५०: बॅटरी आणि स्टोरेज

फोनमध्ये ४२०० एमएएच ची बॅटरी आहे जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगसोबत येते.

मोटोरोला रेजर ५०: सॉफ्टवेअर

अँड्रॉइड १४, ३ वर्षांचे ओएस अपग्रेड, ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट.

इतर फीचर्स : आयपीएक्स 8 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स, डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, ब्लूटूथ 5.4, साइड फिंगरप्रिंट सेन्सर.

 

Whats_app_banner