Motorola: ४ जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५,२००mAh बॅटरी; ६,९९९ रुपयांत आणखी काय हवंय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola: ४ जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५,२००mAh बॅटरी; ६,९९९ रुपयांत आणखी काय हवंय?

Motorola: ४ जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५,२००mAh बॅटरी; ६,९९९ रुपयांत आणखी काय हवंय?

Jan 07, 2025 05:10 PM IST

Moto G05 Launched: मोटोरोलाने भारतात नवा बजेट स्मार्टफोन मोटो जी ०५ लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ५ हजार २०० एमएएचची मोठी बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत. या फोनची किंमत ७ हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.

मोटोरोलाचा नवा बजेट स्मार्टफोन मोटो जी ०५ भारतात लॉन्च
मोटोरोलाचा नवा बजेट स्मार्टफोन मोटो जी ०५ भारतात लॉन्च

Motorola Launches Moto G05 in India: मोटोरोलाने आज त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन मोटो जी ०५ भारतात लॉन्च केला आहे. हा फोन मोटो जी ०४ चा उत्तराधिकारी आहे, जो गेल्या फेब्रुवारीमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला होता. मोटो जी ०५ मध्ये पंच-होल डिस्प्ले आणि पॅन्टोन क्युरेटेड रंगांसह लेदर डिझाइन मिळते. याशिवाय, या फोनमध्ये दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे,  अनेक दमदार फीचर्स असलेल्या या फोनची किंमत ७ हजारांपेक्षा कमी आहे. मोटो जी05 किंमत आणि पहिली विक्री तारीख

मोटो जी ०५ भारतात केवळ ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि त्याची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन प्लम रेड आणि फॉरेस्ट ग्रीन या दोन पॅन्टोन क्युरेटेड कलरमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कलर व्हेरियंटमध्ये व्हेगन लेदर फिनिश मिळत आहे. मोटो जी ०५ हा फोन तुम्ही १३ जानेवारीला दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात.

मोटो जी ०५:  डिस्प्ले आणि प्रोसेसर

मोटो जी ०५ मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १००० निट्स ब्राइटनेस, गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आणि वॉटर टच टेक्नॉलॉजीसह ६.६७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. मोटो जी ०५ स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी ८१ एक्सट्रीम प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी हार्डवेअर आणि ८ जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे.

मोटो जी ०५: कॅमेरा

मोटो जी ०५ मध्ये पोर्ट्रेट मोड आणि ऑटो नाईट व्हिजन सारखे फीचर्स असलेला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी मोटो जी०५ मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटो जी ०५: बॅटरी

मोटो जी०५ मध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार २०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोलाचा दावा आहे की, हा फोन दोन दिवसांची बॅटरी लाइफ देतो.

मोटो जी ०५: सॉफ्टवेअर

मोटो जी ०५ अँड्रॉइड १५ आउट ऑफ द बॉक्स वर चालतो. यात दोन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट मिळण्याची पुष्टी करण्यात आली आहे. मोटो जी ०५ सोबत तुम्हाला धूळ आणि वॉटर प्रोटेक्शनचे आयपी ५२ रेटिंग मिळाले. फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस, हाय-रेस साउंड आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत.

Whats_app_banner