Motorola G45 5G launched in India: मोटोरोलाने आपला लेटेस्ट 5G फोन मोटो जी ४५ लॉन्च करून बजेट स्मार्टफोन सेगमेंटमधील स्पर्धा वाढवली आहे. नवीन मोटो डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन ६ एस जेन ३ चिप आहे आणि ५ हजार एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळत आहे.
मोटोरोलाचा मोटो जी ४५ ५ जी मध्ये ६.४५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन १६०० बाय ७२० पिक्सल आणि १२० हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले ५०० निट्सची पीक ब्राइटनेस देऊ शकतो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ द्वारे संरक्षित आहे.
हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६ एस जेन ३ चिपवर चालतो, जो ६ एनएम प्रक्रियेवर आधारित आहे आणि ग्राफिक्स-गहन कार्ये हाताळण्यासाठी एड्रेनो ६१९ जीपीयूसह जोडला गेला आहे. यात ८ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि १२८ जीबी पर्यंत यूएफएस २.२ स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे.
फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलमॅक्रो लेन्ससह मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा शूटर देखील देण्यात आला आहे.
मोटो जी ४५ 5G मध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह ५ हजार एमएएच बॅटरी आहे, यात अँड्रॉइड १४ आउट ऑफ द बॉक्स असून मोटोरोलोआ यूएक्स स्किन टॉपवर आहे. मोटोरोलाने या डिव्हाइससोबत एक वर्षाचे ओएस अपडेट आणि ३ वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे.
मोटो जी ४५ 5G ४जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १० हजार ९९९ आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ब्रिलियंट ब्लू, ब्रिलियंट ग्रीन आणि व्हिवा मॅजेंटा या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, अॅक्सिस आणि आयडीएफसी फर्स्ट बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना १००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे, ज्यामुळे दोन्ही व्हेरिंएटची किंमत अनुक्रमे ९ हजार ९९९ रुपये आणि १० हजार ९९९ रुपये झाली आहे.