Motorola Edge 50 Pro sale in India: मोटोरोला एज ५० प्रो आजपासून (९ एप्रिल २०२४) भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन ३ एप्रिल २०२४ रोजी भारतात लॉन्च झाला. या फोनमध्ये १४४ हर्ट्झ डिस्प्ले, सिलिकॉन व्हेगन लेदर फिनिश आणि एआय पॉवर्ड प्रोग्रेड कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची खासियत म्हणजे, हा फोनमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात आला आहे.
मोटोरोला एज ५० प्रो दोन व्हेरियंटसह भारतात लॉन्च करण्यात आला आहे. मोटोरोला एज ५० प्रो (८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) फोनची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम व्हेरियंटन ६८ वॅट चार्जर मिळत आहे. तर, १२ जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये १२५ वॅटचा चार्जर दिला जात आहे.
हा फोन आज दुपारी १२ वाजल्यापासून इ-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट, Motorola.in आणि देशभरातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. अर्ली बर्ड ऑफर म्हणून खरेदीदारांना अतिरिक्त २०० रुपयांची सूट, २ हजार २५० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट किंवा २ हजारांचा एक्स्चेंज बोनस मिळू शकतो.
मोटोरोला एज ५० प्रो मध्ये ६.७ इंचाचा पीओएलईडी 3D कर्व्ड डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १.५ के रिझोल्यूशन, १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २००० नाइट्सची पीक ब्राइटनेस आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यात ५० मेगापिक्सल एआय-संचालित कॅमेरा देण्यात आला आहे. मोटोरोला एज ५० प्रो मध्ये ४ हजार ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली, जी १२५ वॅट वायर्ड आणि ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी पसंती मिळवेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.