Motorola Edge 50 Pro Price and Features: बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन मोटोरोला एज ५० प्रो भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोना गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या मोटोरोला एज ४० प्रोचा अपडेट व्हर्जन आहे. मोटोरोला एज ५० प्रोच्या फीचर्समध्ये १४४ हर्ट्झ डिस्प्ले, सिलिकॉन व्हेगन लेदर फिनिश आणि एआय-संचालित प्रोग्रेड कॅमेऱ्याचा समावेश आहे. मोटोरोला एज ५० प्रोची किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घेऊयात.
मोटोरोला एज ५० प्रो मध्ये ६.७ इंचाचा पीओएलईडी 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १.५ के आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसरसह ८ जीबी LPDDR4X रॅम देण्यात आली आहे. हे अँड्रॉइड १४ वर आधारित नवीन मोटोरोला हॅलो यूएक्स इंटरफेसवर चालते.
मोटोरोला एज ५० प्रोच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात प्रायमरी ५० मेगापिक्सल एआय-संचालित कॅमेरा आहे. यात नवीन फोटो एन्हान्समेंट इंजिन देखील देण्यात आले आहे, जे डायनॅमिक रेंज सुधारते. कॅमेरा सिस्टम अनुकूल व्हिडिओ स्थिरीकरण साध्य करण्यासाठी मोटो एआयचा देखील वापर करते. मोटोरोला एज ५० प्रोचा डिस्प्ले आणि कॅमेरा सिस्टम दोन्ही पॅन्टोन-प्रमाणित आहेत. मोटोरोला एज ५० प्रो मध्ये ४ हजार ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून यामध्ये १२५ वॉट वायर्ड आणि ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
मोटोरोला एज ५० प्रो दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात दाखल झाला आहे. ज्यात ग्राहकांना ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज मिळते. ८ जीबी + २५६ जीबी ज्याची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी + २५६ जीबी ज्याची किंमत ३५ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मोटोरोला 8 जीबी रॅम व्हेरिएंटसह ६८ वॅट चार्जर आणि १२ जीबी रॅम व्हेरिएंटसह १२५ वॅट चार्जर मिळते.
या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना २ हजार रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. याशिवाय, २ हजार २५० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट किंवा २ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील मिळत आहे. मोटोरोला एज ५० प्रो ९ एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
संबंधित बातम्या