Motorola Edge 50 launched in India: मोटोरोला एज ५० हा स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मोटोरोला एज ५० सीरिजच्या कुटुंबात सामील झाला आहे, ज्यात एज ५० फ्यूजन आणि प्रीमियम एज ५० प्रो आणि एज ५० अल्ट्रा देखील समाविष्ट आहे. हा स्मार्टफोनमधील डिझाइन एक सारखीच आहे. जाणून घ्या नव्याने लॉन्च झालेल्या स्मार्टफोनबद्दल.
मोटोरोला एज ५० मध्ये ६.६७ इंचाचा पीओएलईडी 1.5K डिस्प्ले असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १९०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ सह संरक्षित आहे, ज्यामुळे तो स्क्रॅच आणि इम्पॅक्ट रेझिस्टंट बनतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ प्रोसेसर सह मोटोरोलाची व्हेपर कूलिंग सिस्टिम देण्यात आली आहे. एज ५० अँड्रॉइड १४ वर आधारित हॅलो यूआयवर चालेल. मोटोरोला २ वर्षांचे मोठे सॉफ्टवेअर अपडेट आणि ३ वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस देखील देत आहे.
फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज ५० मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात सोनी-लिटिया ७०० सी सेन्सरसह ५० एमपी मुख्य कॅमेरा, १३ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे आणि ३ एक्स ऑप्टिकल झूमसह १० एमपी टेलिफोटो लेन्स मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ५०००० एमएएच बॅटरीसह सुसज्ज आहे, जो ६८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.
मोटोरोला एज ५० जंगल ग्रीन, पॅन्टोन पीच फ्यूज आणि कोआला ग्रे या तीन रंगांमध्ये लाँच करण्यात आला होता. ग्रीन आणि पीच व्हेरियंटमध्ये व्हेगन लेदर बॅक देण्यात आला आहे, तर ग्रे कलर ऑप्शनमध्ये व्हेगन बॅक देण्यात आला आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल मेमरीच्या केवळ एका स्टोरेज व्हेरिएंटची घोषणा करण्यात आली होती. मोटोरोला एज ५० ची किंमत २७ हजार ९९९ रुपये असून ८ ऑगस्ट २०२४ पासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डट्रान्झॅक्शनचा वापर करून ग्राहकांना २००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट देखील मिळणार आहे.
संबंधित बातम्या