Moto G54 5G : अवघ्या १६ हजारांत 5G स्मार्टफोन; ५० एमपी कॅमेऱ्यासह मिळणार हे जबरदस्त फीचर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Moto G54 5G : अवघ्या १६ हजारांत 5G स्मार्टफोन; ५० एमपी कॅमेऱ्यासह मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Moto G54 5G : अवघ्या १६ हजारांत 5G स्मार्टफोन; ५० एमपी कॅमेऱ्यासह मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Sep 06, 2023 04:01 PM IST

Moto G54 5G in India : कमीत कमी बजेटमध्ये ५जी स्मार्टफोन शोधत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

motorola g54 5g specifications and price in india
motorola g54 5g specifications and price in india (HT)

motorola g54 5g specifications and price in india : कमीत कमी किंमती चांगले फीचर्स असणारे स्मार्टफोन मार्केटमध्ये येत आहे. विविध कंपन्यांकडून ग्राहकांना ५जी सेवा स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु १५ ते १७ हजार रुपयांपर्यंत स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण मोटरोला कंपनीने ग्राहकांसाठी केवळ १६ हजार रुपयांत बंपर फीचर्स असलेला Moto G54 5G हा स्मार्टफोनच्या लॉन्च केला आहे. ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ६ हजार एमएएच्या बॅटरी बॅकअपसह हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळं अनेकांनी बंपर फीचर्स असलेल्या Moto G54 5G या स्मार्टफोनची बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.

काय असतील फीचर्स?

मोटोरोला कंपनीच्या Moto G54 5G या स्मार्टफोनमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ गेमिंग, मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ५० एमपी कॅमेऱ्याचे फीचर्स देण्यात आले आहे. रियलमी आणि रेडमी या कंपनीच्या स्मार्टफोन्सला टक्कर देत मोटोरोलाच्या या स्मार्टफोन मार्केट काबीज करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि फुल HD+ (२४०० x १०८०) रिझोल्यूशनसह ६.५-इंचाचा LED डिस्प्ले आहे. या सिरिजमध्ये ८-१२८ जीबी आणि १२-२५६ जीबी अशा दोन स्टोरेजचे स्मार्टफोन्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. ८-१२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन १५९९९ रुपयांना मिळणार आहे. ३३W चार्जिंगसह ६००० एमएएच बॅटरी आणि कॅमेऱ्यात ओआयएसची सेवा देण्यात आली आहे.

भारतात किती किंमत असणार आहे?

मोटोरोलाचा Moto G54 5G या सिरिजच्या २५६ जीबीच्या स्मार्टफोनची किंमत १८९९९ रुपये इतकी आहे. बँक ऑफर, क्रेडिट कार्ड किंवा एक्सचेंज ऑफरसह तुम्ही स्मार्टफोनची किंमत कमी करू शकता. मोजक्या ऑफर्स अप्लाय केल्यास हा स्मार्टफोन १४४९९ रुपयांपर्यंत मिळू शकतो. याशिवाय मोटोरोला कंपनीने जिओ कंपनीसोबत भागिदारी केलेली आहे. त्यामुळं जिओच्या प्लॅनवर तुम्हाला दोन हजार रुपयांपर्यंतचं कॅशबॅक मिळू शकतं. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन सर्व ई-कॉमर्स साइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Whats_app_banner