महिनाभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोटोरोलाच्या फोनचा स्फोट, वापरकर्त्याने शेअर केला फोटो-motorola budget smartphone moto g34 5g blast ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  महिनाभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोटोरोलाच्या फोनचा स्फोट, वापरकर्त्याने शेअर केला फोटो

महिनाभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोटोरोलाच्या फोनचा स्फोट, वापरकर्त्याने शेअर केला फोटो

Sep 08, 2024 08:52 PM IST

Moto G34 5G Blast: मोटोरोला कंपनीचा नवा फोन स्मार्टफोन मोटो जी ३४ 5G मध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती समोर आली.

मोटोरोलाच्या फोनचा स्फोट
मोटोरोलाच्या फोनचा स्फोट

Moto G34 5G Blast: महिन्यापूर्वी खरेदी केलेल्या मोटोरोलाचा मोटो जी ३४ ५जी मध्ये अचानक स्फोट झाल्याने वापरकर्त्याने संताप व्यक्त केला आहे. या जळालेल्या फोनची वापरकर्त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केली आहेत. यानंतर ही खरोखरच एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

रामबाबू सोलंकी नावाच्या एक्स युजरने मोटोरोलाचा मोटो जी ३४ ५जी स्मार्टफोनच्या रिअर कॅमेऱ्याच्या बाजूचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, फोनमध्ये बॅटरी असलेल्या जागेत जळाले आहे. वापरकर्त्याने आपण कोणत्या दिवशी हा फोन खरेदी केला आहे, त्याचा पुरावा म्हणून बिल देखील शेअर केला आहे. हा फोन यावर्षी जुलै महिन्यात खरेदी केला आहे. याव्यतिरिक्त फोनबाबत इतर कोणतीही माहिती दिलेली नाही. फोनमध्ये स्फोट होण्याची अनेक कारणे असू शकतात. बॅटरीमध्ये काही बिघाड झाला तरच फोनमध्ये स्फोट होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

स्मार्टफोनमध्ये स्फोट होण्याची कारणे

- फोनमधील प्रोसेसर ओव्हरलोड झाल्याने आणि फोन ब्लास्ट होण्याची भीती खूप वाढते.

- फोन नेहमीच पाण्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पाण्यामुळे बॅटरीमध्ये स्फोट होण्याच्या शक्यता अधिक असते.

- कंपनीच्या चार्जरव्यतिरिक्त दुसऱ्या चार्जरने फोन चार्ज केल्यास तो धोकादायक ठरू शकतो.

- फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये. यामुळे बॅटरी ओव्हरहीटिंग होऊन स्फोट होण्याची शक्यता आहे.

मोटो जी ३४ फीचर्स

मोटो जी ३४ मध्ये ६.५ इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. मोटो जी ३४ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० एमपी प्रायमरी कॅमेरा आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा आहे. तर,मोटो जी ३४ मध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर ६ एनएम स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हे अँड्रॉइड १४ वर आधारित मोटोरोलच्या माययूएक्सवर चालते. मोटो जी३४ मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी २० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फूलचार्ज करण्यासाठी १ तास ३० मिनिटांचा चार्ज वेळ लागतो. हा स्मार्टफोन चारकोल ब्लॅक, आइस ब्लू आणि ओशन ग्रीन या तीन अनोख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Whats_app_banner
विभाग