मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola: मोटोरोलाचा नवा फोल्डेबल फोन धुमाकूळ घालणार, जबरदस्त लूकसह दमदार फीचर्स मिळणार!

Motorola: मोटोरोलाचा नवा फोल्डेबल फोन धुमाकूळ घालणार, जबरदस्त लूकसह दमदार फीचर्स मिळणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 22, 2024 03:49 PM IST

Moto Razr 40 Ultra 2024 : लवकरच कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन मोटो रेझर ४० अल्ट्रा २०२४ भारतात लॉन्च होणार असल्याची शक्यता आहे.

Moto Razr 40 Ultra
Moto Razr 40 Ultra

Motorola Foldable Smartphone: मोटोरोला कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची प्रतिक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन मोटोर रेझर ४० अल्ट्रा २०२४ बाजारात दाखल होतोय. एमएसपॉवरने या आगामी फोनबाबत माहिती दिली आहे. हा फोन क्लासिक ग्रे रंगात बाजारात दाखल होणार असल्याची माहिती आहे.

हा फोन क्लॅमशेल डिझाइन, एलइडी प्लॅश आणि दोन वेगवेगळ्या कॅमेरा रिंगसह येतो. हा फोन परफॉर्मंस आणि बॅटरीच्याबाबतीत पूर्वीपेक्षा दमदार असेल, असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये ग्राहकांना मोठा डिस्प्ले मिळत आहे आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी सेंट पंच- होल कटआऊट पाहायला मिळत आहे. फोनच्या फीचर्सबाबत कंपनी येत्या काही दिवसांत स्पष्ट करेल. हा फोन बाजारात असलेल्या मोटो रेझर ४० अल्ट्राचा अपडेट व्हेरिएंट असेल.

मोटो रेझर ४० अल्ट्रा फीचर्स

या फोनमध्ये ६.९ इंच इंच फ्लेक्स व्ह्यू POLED डिस्प्ले मिळत आहे, जो डिस्प्ले १६५Hz रिफ्रेशला सपोर्ट करतो. डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट ३६०Hz आहे. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला १४०० nits चा पीक ब्राइटनेस लेव्हल मिळेल. या मोटो फोनचा कव्हर डिस्प्ले ३६ इंच आहे आणि तो १४४Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 5 देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सेलचा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइट अँगल मिळत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सह येतो. कंपनी या फोनमध्ये ३ हजार ८०० बॅटरी मिळते, जी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

WhatsApp channel

विभाग