Motorola: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी; मोटोरोलाने गुपचूप लॉन्च केले ‘हे’ दोन 5G फोन-moto g55 moto g35 with 50 megapixel primary camera 5 000mah battery launched ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी; मोटोरोलाने गुपचूप लॉन्च केले ‘हे’ दोन 5G फोन

Motorola: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी; मोटोरोलाने गुपचूप लॉन्च केले ‘हे’ दोन 5G फोन

Aug 30, 2024 02:41 PM IST

Motorola G Series Launched: मोटोरोला नुकतेच त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत, ज्यात मोटो जी ५५ आणि मोटो जी ३५ अशा दोन स्मार्टफोनचा समावेश आहे.

मोटोरोलाची जी सीरिज लॉन्च
मोटोरोलाची जी सीरिज लॉन्च

Moto G55 5G and Moto G35 5G Launched: मोटोरोलाने आपले दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च केले आहेत. दोन्ही फोन मोटोच्या जी सीरिजअंतर्गत सादर करण्यात आले आहेत, ज्यात मोटो जी ५५ 5G आणि मोटो जी ३५ 5G या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. या दोन फोनपैकी एक फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर दुसरा मिड-रेंज 5G फोन आहे. मोटो जी ३५ हा ब्रँडचा एंट्री-लेव्हल 5G फोन आहे, तर मोटो जी ५५ 5G मोटोरोलाच्या मिड-रेंज लाइनअपमध्ये सामील झाला आहे.

मोटो जी ५५ 5G: डिस्प्ले

मोटोरोलाचा मोटो जी ५५ 5G मध्ये ५ इंचाचा आयपीएस एलसीडी पॅनेल मिळतो, जो एफएचडी+ रिझोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो.  फोनचे डायमेंशन ७०२५ आहे, जे ब्रँडने यापूर्वी मोटो जी ६४ मध्ये दिले आहेत.

मोटो जी ५५ 5G: स्टोरेज आणि बॅटरी

मोटो जी ५५ 5G हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम/१२८, ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम/२५६ जीबी अशी तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर, या फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटो जी ५५ 5G: कॅमेरा

मोटो जी ५५ 5G मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स मिळत आहे. तर, सेल्फीसाठी मोटो जी ५५ मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटो जी ५५ 5G: किंमत

हा फोन युरोपमध्ये २४९ युरो (अंदाजे २३,१३४ रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ट्वाइलाइट पर्पल, स्मोकी ग्रीन आणि फॉरेस्ट ग्रे अशा तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.

मोटो जी ५५ 5G: फीचर्स आणि किंमत

मोटो जी ५५ 5G मध्ये एचडी+ रिझोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ७२ इंचाचा एलसीडी पॅनेल देण्यात आला आहे.  हा फोन ४ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज असे दोन व्हेरिएंट मिळत आहेत. यात १८ वॅट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. मोटो जी ३५ 5G फोनची किंमत १९९ युरो (सुमारे १८ हजार ४८९  रुपये) आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर, मागील बाजूस १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मोटो जी ३५ हा फोन लीफ ग्रीन (विगन लेदर), पेरू रेड आणि मिडनाइट ब्लॅक अशा ३ रंगांमध्ये उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी

दोन्ही फोन हॅलो यूआय फ्लेवर्ड अँड्रॉइड १४ सह प्रीलोडेड आहेत. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस-ड्युअल स्पीकर्स, ३.५ एमएम हेडफोन जॅक, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आणि फोन आयपी ५२- रेटेड आहे.

विभाग