Moto G 5G 2025 Features Leaked: टेक कंपनी मोटोरोला लवकरच नवीन बजेट फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन मोटो जी 5G (२०२५) असेल, जो मोटो जी 5G (२०२४) ची जागा घेईल. कंपनीने या वर्षी मार्चमध्ये हा फोन लॉन्च केला होता. लवकरच मोटो जी 5G (२०२५) हा फोन बाजारात दाखल होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या फोनमध्ये मिळणारे फीचर्स लीक झाले आहेत.
लीक झालेल्या माहितीनुसार, मोटो जी 5G (२०२५) फ्लॅट डिस्प्लेसह बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, या फोनमध्ये अधिपेक्षा थोडे जाड बेजल, स्पीकर ग्रिलसह ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि बाजूला बटण मिळू शकते. रिअर कॅमेरा मॉड्यूलच्या डिझाइनमध्ये बदल आणि अपग्रेडसोबतच एक अतिरिक्त सेन्सरही देण्यात येऊ शकते. सध्याच्या मोटो जी 5G फोनमध्ये दोन सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह चौकोनी आकाराचा रिअर कॅमेरा युनिट आहे. मोटो जी 5G (२०२५) च्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण दिसत आहे. तर, खालच्या बाजूला ३.५ मिमी ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल ठेवण्यात आले आहे.
मोटो जी 5G (२०२५) मध्ये सध्याच्या मोटो जी 5G (२०२४) प्रमाणेच ६.६ इंचाची स्क्रीन असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरा बंपसह हँडसेटची जाडी ९.६ मिमी असू शकते. मोटो जी 5G (२०२५) मध्ये ६.६ इंचाचा एफएचडी+ १२० हर्ट्झ डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन १ एसओसी प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे, ज्याला १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
मोटो जी 5G (२०२५)) मध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, २ एमपी मॅक्रो कॅमेरा आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
या फोनमध्ये ५,००० एमएएच ची बॅटरी असेल, जी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन माय यूएक्ससोबत अँड्रॉइड १४ सह येणार आहे.
मोटो जी ५ जी (२०२५) हा एक बजेट स्मार्टफोन आहे ज्याची किंमत अमेरिकेत १९९.९९ डॉलर (अंदाजे १६ हजार ५६९ रुपये) असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या स्मार्टफोनविषयी अधिक माहिती ऑनलाइन समोर येऊ शकते.