Moto Edge 50 Series: मोटोरोला एज ५० सीरिजचा नवा स्मार्टफोन या महिन्यात अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह लाँच होत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन चाहते मोटो एज ५० अल्ट्राच्या लॉन्चिंगची वाट बघत होते आणि आता अखेर स्मार्टफोनच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. मोटोरोला स्मार्टफोनचे अनेक डिटेल्स आणि डिझाइन्स टीज करत आहे, ज्यामुळे मोटोरोला एज ५० सीरिजच्या "अल्ट्रा" व्हेरिएंटसह काय येणार आहे? याबद्दल उत्सुकता वाढली आहे. मोटो एज ५० अल्ट्रामध्ये नेमकी कोणकोणती फीचर्स मिळण्याची शक्यता आहे, हे जाणून घेऊयात.
मोटोरोलाने नुकतीच मोटो एज ५० अल्ट्राच्या अधिकृत लाँचिंग तारखेची पुष्टी केली. त्यानुसार हा स्मार्टफोन येत्या १८ जून २०२४ रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "#MotorolaEdge50Ultra, आपल्या खिशाच्या आकाराच्या एआय आर्ट स्टुडिओसह अमर्याद जगाची कल्पना करा. 100 x एआय सुपर झूम प्रत्येक तपशील कॅप्चर करते, तर स्मार्ट कनेक्ट सहजपणे आपल्या डिव्हाइसेसला कनेक्ट करते. हा फोन १८ जूनपासून फ्लिपकार्ट आणि मोटोरोलोच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे.
मोटो एज ५० अल्ट्रामध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले असेल, ज्यात १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट, १०० टक्के डीसीआय-पी 3 कलर सरगम, एचडीआर 10+ आणि 2500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस असेल. डिस्प्लेकॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टससह प्रोटेक्टेड असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये ४ एनएम स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर आहे जो एआय प्रोसेसिंगला देखील समर्थन देतो आणि फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ सारखीच कार्यक्षमता प्रदान करतो.
मोटो एज ५० अल्ट्रामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यात ओआयएससह ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असण्याची शक्यता आहे. मॅक्रो सॅमसंग जेएन १ सेन्सरसह ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ३ एक्स ऑप्टिकल झूमसह ६४ मेगापिक्सल पोर्ट्रेट टेलिफोटो कॅमेरा असेल. फोनच्या फ्रंटमध्ये ५० मेगापिक्सलचा ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. शेवटी, स्मार्टफोनमध्ये 125 वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४ हजार ५०० एमएएच बॅटरी असण्याची शक्यताआहे.