Google news : गुगलला अमेरिकेच्या न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. गुगलनं अविश्वास कायद्याचं उल्लंघन केल्याचा निर्णय अमेरिकन न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला आहे. गुगलने स्वतःला जगातील डीफॉल्ट सर्च इंजिन बनवण्यासाठी व मक्तेदारी प्रस्थापित व कायम ठेवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केल्याचं न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे संभाव्य सुधारणा निश्चित करण्यासाठी गुगल विरोधात दुसऱ्या खटल्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे. यामध्ये गूगल पॅरेंट अल्फाबेट का ब्रेकअप (विघटन) देखील समाविष्ट असू शकते. असे झाल्यास, गेल्या अनेक वर्षांपासून गुगलचे राज्य असलेल्या ऑनलाइन जाहिरातींच्या जगात मोठा बदल दिसून येईल. २०२३ मध्ये, अल्फाबेटच्या एकूण विक्रीत गुगल जाहिरातींचा वाटा ७७ टक्के होता.
वॉशिंग्टन डी. सी. अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश अमित मेहता यांनी आपल्या निर्णयात लिहिलं की, गुगल ही मक्तेदारी आहे आणि त्यांनी आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी अनेक कृत्य केली आहेत. न्यायमूर्तींनी पुढं लिहिलं की, गुगल ऑनलाइन सर्च मार्केटवर ९० टक्के आणि स्मार्टफोनवर ९५ टक्के नियंत्रण ठेवते. मेहता म्हणाले की गुगलने त्याचे सर्च इंजिन स्मार्टफोन आणि ब्राउझरवर डीफॉल्टनुसार ऑफर केले जाईल, यासाठी २०२१ मध्ये २६.३ अब्ज डॉलर्स दिले होते.
मेहता यांच्या निर्णयावर वरच्या न्यायालयात अपील करणार असल्याचं अल्फाबेटने सांगितले. गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की गुगल सर्वोत्तम सर्च इंजिन आहे. कंपनीने पुढं म्हटलं आहे की, सर्वोत्कृष्ट असल्याने गुगल सर्च इंजिन यापुढे सहजासहजी उपलब्ध करून देऊ नये. असे कंपनीनं म्हटलं आहे.
दुसरीकडे, यूएस ऍटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी या निर्णयाला अमेरिकन यूझर्ससाठी ऐतिहासिक विजय म्हटलं आहे. कंपनी कितीही मोठी किंवा प्रभावशाली असली तरी ती कायद्याच्यावर असू शकत नाही, असे देखील त्यांनी म्हटलं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की टेक स्टॉक्समध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात घसरण होत असताना अल्फाबेटच्या शेअर्समध्ये सोमवारी ४.५ टक्यांची घसरण झाली आहे.