मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MPC meeting : रेपो दरात ३५ बेसिस पाँईंट्सची वाढ शक्य, तिमाही पतधोरण बैठक आजपासून

MPC meeting : रेपो दरात ३५ बेसिस पाँईंट्सची वाढ शक्य, तिमाही पतधोरण बैठक आजपासून

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 05, 2022 12:01 PM IST

MPC meeting : रिझर्व्ह बॅकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचा निकाल ७ डिसेंबरला होणार आहे. मध्यवर्ती बॅक व्याजदरात ०.२५ ते ०.३५ बेसिस पाँईंट्सची वाढ करण्याची शक्यता आहे.

RBI policy HT
RBI policy HT

RBI Policy : रिझर्व्ह बॅकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचा निकाल ७ डिसेंबरला होणार आहे. मध्यवर्ती बॅक व्याजदरात ०.२५ ते ०.३५ बेसिस पाँईंट्सची वाढ करण्याची शक्यता आहे.

किरकोळ महागाईतील घट आणि आर्थिक वृद्धीदराला बकळटी देण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बॅक बुधवारी जाहीर होणाऱ्या तिमाही पतधोरणात व्याजदरांबाबत मवाळ भूमिका घेऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते व्याजदरात सलग तीन वेळा अर्धा टक्का वाढ केल्यानंतर आता रिझर्व्ह बॅक व्याजदरात ०.२५ टक्के ते ०.३५ टक्के वाढ करु शकते. तीन दिवसांच्या या बैठकीनंतरचे निकाल ७ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. याचाच अर्थ रिझर्व्ह बॅकेचे तिमाही पतधोरण ७ डिसेंबरला आहे. या व्याजदरांसंदर्भातील निकालानंतर रिझर्व्ह बॅक अमेरिकेच्या फेडरल बॅकेप्रमाणेही डिसेंबर महिन्याच्या अखेरीसही काही व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बॅक या वर्षी मे महिन्यापासून मुख्य व्याजदरात १.९० टक्के वाढ झाली आहे. तरीही चतनवाढ अंदाजे ६ टक्क्यांच्या वर आहेत.

बॅक आँफ बडोदाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, एमपीसीच्या बैठकीत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही वाढ ०.२५ ते ०.३५ टक्के वाढ होईल. रेपो दरात या वर्षात ६.५ टक्के वाढ झाली आहे.

किरकोळ महागाई दरात घट

रिझर्व्ह बॅक तिमाही पतधोरण जाहीर करताना प्रामुख्याने ग्राहक महागाई निर्देशांकाकडे अधिक लक्ष देते. सीपीआयमध्ये घट झाली आहे. मात्र त्यातील वाढ अद्यापही अधिक आहे. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे अर्थतज्ज्ञ डी.के.पंत म्हणाले की, महागाई दरात झालेली घट झाली आहे. या तिमाहीत ती सहा टक्क्यांच्या वर राहिली आहे. रिझर्व्ह बॅक ७ डिसेंबरच्या तिमाही पतधोरणात व्याजदरात ०.२५ टक्के वाढ करु शकते.

फेडरल रिझर्व्हकडूनही नरमाईचे संकेत

यूएस फेडरल रिझर्व्हने त्यांच्या पतधोरणातील काही मुद्दे आज प्रकाशित केले आहेत. त्यानुसार, फेडरल रिझर्व्हही व्याजदरात कपात करु शकते. यामुळे रोजगाराला पाठबळ मिळण्यास मदत होईल आणि आर्थिक वृद्धी दरातही वाढ होईल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग