मराठी बातम्या  /  business  /  EPFO: मूळ वेतन २१ हजारपर्यंत असलेले कर्मचारीही पीएफच्या कक्षेत?; फायदा नेमका कोणाचा?
EPFO HT
EPFO HT

EPFO: मूळ वेतन २१ हजारपर्यंत असलेले कर्मचारीही पीएफच्या कक्षेत?; फायदा नेमका कोणाचा?

25 November 2022, 12:00 ISTKulkarni Rutuja Sudeep

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) मुळे देशातील साडे सहा कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर. आता मूळ वेतनाची मर्यादा १५ हजारांहून २१ हजार रुपये होणार आहे.

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील अंदाजे साडे सहा कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार पेंन्शन फंडच्या कमाल मर्यादेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करम्याची शक्यता आहे. ईपीएफओच्या सेवा निवृत्त बचत योजनेसाठी वेतन मर्यादा लवकरच वाढण्याची शक्यता आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, सध्या १५ हजार प्रति महिना असलेली मर्यादा आता २१ हजार रुपये प्रति महिना होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२०१४ मध्ये वेतन मर्यादा १५ हजार झाली

याआधी २०१४ मध्ये ६५०० रुपये प्रति महिना असलेली वेतन मर्यादा १५ हजार रुपये करण्यात आली होती. ही योजना केवळ ज्या कंपन्यांमध्ये २० कर्मचाऱी आहेत,त्यांच्यासाठी लागू करण्यात आली आहे.

सरकारची नेमकी योजना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारला अधिकाधिक लोकांना पीएफच्या मर्यादेत आणण्याची योजना आहे. या नव्या योजनेमुळे ईपीएफओअंतर्गत अंदाजे ७५ लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा समावेश होणार आहे. आज, अंदाजे ६८ दशलक्ष कर्मचारी यात मर्यादेत आहेत.

पेंन्शनमध्येही होणार वाढ

पगाराच्या मर्यादेत वाढ झाल्याने कर्मचारी आणि कर्मचारी काम करत असलेल्या कंपनीतील जमा केलेल्या पीएफचा हिस्सा वाढेल. आता १५००० रुपयांवर १८०० रुपये पेंन्शन आहे. जर ते २१००० पर्यंत वाढवले ​​तर ते २५३० रुपये होईल. यामुळे भविष्यात तयार होणारा कर्मचाऱ्यांचा पेन्शन फंड सध्याच्या निधीपेक्षा जास्त असेल.

विभाग