मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Import ban on laptop : लॅपटाॅप, टॅबलेट,पीसीवरील आयातबंदी १ नोव्हेंबरपर्यंत टळली, मोदी सरकारने का मागे घेतला निर्णय ?

Import ban on laptop : लॅपटाॅप, टॅबलेट,पीसीवरील आयातबंदी १ नोव्हेंबरपर्यंत टळली, मोदी सरकारने का मागे घेतला निर्णय ?

Aug 05, 2023 10:59 AM IST

Import ban on laptop : लॅपटाॅप, टॅबलेट, पीसीवरील आयत बंदीचा निर्णय मोदी सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. सरकारच्या मते, बंदीच्या निर्णयामुळे बाजारात पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

 tablet File ftg HT
tablet File ftg HT (Priya/HT Tech)

Import ban on laptop : लॅपटाॅप, टॅबलेट आणि पर्सनल कम्युटरच्या आयतीसाठी लायसन्सिंग व्यवस्था अनिवार्य करण्याच्या एक दिवसानंतरच मोदी सरकारने शुक्रवारी हा निर्णय़ स्थगित केला आहे. हा निर्णय सरकारने पुढील तीन महिने १ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. सरकारच्या मते, आयातबंदीमुळे पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि किंमतीत वाढ होऊ शकते.

शुक्रवारी एक अधिसुचना जाहीर करत विदेश व्यापार महानिदेशालयाने (डीजीएफटी) सांगितले की, लॅपटाॅप, कम्प्यूटर आणि टॅबलेटच्या आयातीला ३१ आॅक्टोबर २०२३ पर्यंत विना लायन्सेस मंजूरी देण्यात येईल. डीजीएफटीने सांगितले की, इन वन पीसी, अल्ट्रा स्माॅल फाॅर्म फॅक्टर, कम्प्यूटर आणि सर्व्हर एचएसएन ८४७१ अंतर्गत येतात.

टीओआयच्या वृत्तानुसार, सरकार डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आले आहे. कारण सॅमसंग, अॅप्पलसारख्या बड्या कंपन्यांना यामुळे देशातील शीपमेंट रोखावे लागेल. या कंपन्यांना पुरवठा साखळी सुरू ठेवण्यासाठी लायसन्सची आवश्यकता असते. सरकारने नवीन व्यवस्था लागू करण्याच्या १२ तास आधी नोटीस जारी केली. त्यामुळे या कंपन्यांना अचानक भारतात आपल्या सोर्सिंग योजना बदलावी लागली असती.

ट्रेंडिंग न्यूज

आयटी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार बड्या कंपन्या कंम्प्यूटर आणि टॅबलेट कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छिते. मात्र नव्या नियमांमुळे त्यावर रोख लागू शकते. डीजीएफटी मिनिटांच्या आत लायसन्स जारी करेल. उत्पादनांची संख्या, आयातीचे प्रमाण अथवा प्रति उत्पादन संख्येवर लाययसन्स जारी करण्यावर कोणतेही मर्यादा नसल्याचे डीजीएफटीने स्पष्ट केले आहे.

WhatsApp channel
विभाग