Mobikwik IPO : मोबिक्विक आयपीओचं वाटप झालं! तुम्हाला शेअर मिळाले की नाही? असं तपासा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mobikwik IPO : मोबिक्विक आयपीओचं वाटप झालं! तुम्हाला शेअर मिळाले की नाही? असं तपासा!

Mobikwik IPO : मोबिक्विक आयपीओचं वाटप झालं! तुम्हाला शेअर मिळाले की नाही? असं तपासा!

Dec 16, 2024 12:18 PM IST

Mobikwik IPO allotment : गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला मोबिक्विकच्या आयपीओ अलॉटमेंटची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

मोबिक्विक आयपीओचं वाटप आज होण्याची शक्यता; तुम्हाला लागला का? असं तपासा!
मोबिक्विक आयपीओचं वाटप आज होण्याची शक्यता; तुम्हाला लागला का? असं तपासा! (REUTERS)

Mobikwik IPO allotment News Marathi : वन मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेडच्या आयपीओ अलॉटमेंटची प्रतीक्षा संपली आहे. आयपीओसाठी गुंतवणूक करणाऱ्या भाग्यवंतांना शेअर्सचं वाटप करण्यात आलं आहे. तुम्ही देखील आयपीओसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला शेअर्स मिळाले का, हे ऑनलाइन तपासता येणार आहे.

अर्जदार बीएसईची वेबसाइट किंवा लिंक इनटाइमच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून मोबिक्विकची आयपीओ अलॉटमेंट स्टेटस ऑनलाइन तपासू शकतात. मोबिक्विक आयपीओ जोरदार सब्सक्राइब झाला असून ग्रे मार्केटनं आयपीओची उत्तम लिस्टिंग होण्याचे संकेत दिले आहेत. शेअर बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबिक्विकचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये १६६ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.

मोबिक्विक आयपीओ अलॉटमेंट लिंक्स

मोबिक्विक आयपीओ अलॉटमेंट स्टेटस बीएसई वेबसाइटवर किंवा लिंक इनटाइम वेबसाइटवर ऑनलाइन तपासले जाऊ शकते. अर्जदार बीएसईच्या थेट लिंकवर लॉग इन करू शकतात- bseindia.com/investors/appli_check.aspx- किंवा थेट लिंक इनटाइम लिंक-linkintime.co.in/initial_offer/public-issues.html- आणि मोबिक्विक आयपीओ अलॉटमेंट स्टेटस ऑनलाइन तपासू शकतात.

बीएसईवर असं तपासा स्टेटस

> थेट बीएसई लिंकवर लॉग इन करा - bseindia.com/investors/appli_check.aspx;

> इश्यू टाईप पर्यायात 'इक्विटी' निवडा;

> 'इश्यू नेम' पर्यायात 'वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेड' निवडा

> अर्ज क्रमांक किंवा पॅन क्रमांक टाका

> 'मी रोबोट नाही' निवडा

> 'सर्च' बटणावर क्लिक करा.

आपला मोबिक्विक आयपीओ अलॉटमेंट स्टेटस आपल्या संगणक मॉनिटरवर किंवा आपल्या सेल फोनच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल.

लिंक इनटाइमवर असं तपासा आयपीओ स्टेटस

> डायरेक्ट लिंक इनटाइम लिंकवर लॉग इन करा - linkintime.co.in/Initial_Offer/public-issues.html

> कंपनीच्या नावानं 'वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेड' निवडा

> पॅन, अ‍ॅप्लिकेशन नंबर, डीपी/क्लायंट आयडी किंवा अकाउंट नंबर किंवा आयएफएससी यापैकी एक निवडा.

> 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

आपला मोबिक्विक आयपीओ अलॉटमेंट स्टेटस आपल्या संगणक मॉनिटरवर किंवा आपल्या सेल फोनच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल.

मोबिक्विक आयपीओ आज जीएमपी

बाजार निरीक्षकांच्या मते, मोबिक्विक आयपीओ जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) आज १६६ रुपये आहे, याचा अर्थ ग्रे मार्केटला मेनबोर्ड इश्यूच्या अप्पर प्राइस बँडवर ५९ टक्के लिस्टिंग प्रीमियमची अपेक्षा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner