MMTC Share price : ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या शेअरनं दिले छप्परफाड रिटर्न
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MMTC Share price : ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या शेअरनं दिले छप्परफाड रिटर्न

MMTC Share price : ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या शेअरनं दिले छप्परफाड रिटर्न

Sep 06, 2023 03:15 PM IST

MMTC Share price : एमएमटीसीच्या शेअरनं अल्पावधीत मजबूत रिटर्न्स देत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

Stock Market
Stock Market

MMTC Share price : मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. त्याचा फायदा अनेक कंपन्यांच्या शेअर्सना झाला आहे. अनेक शेअरना अप्पर सर्किट लागलं आहे. यात एमएमटीसी आणि आयआरएफसी हे शेअर प्रामुख्यानं चर्चेत आहेत.

बीएसईवर आज ३५६ शेअरना अप्पर सर्किट लागले. त्यातील अ गटात फक्त दोन स्टॉक्स आहेत. या दोन्ही स्टॉकना २० टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आहे. दुपारी एक वाजेपर्यंत ग्रुप ब मध्ये १२, ग्रुप एम मध्ये १६, ग्रुप एम मध्ये २, ग्रुप पी मध्ये २, ग्रुप टी मध्ये ६७, ग्रुप एक्समध्ये ३४, ग्रुप एक्सटीमध्ये १९९, ग्रुप झेडमध्ये २२ शेअर्सना ५ ते २० टक्क्यांपर्यंतच सर्किट लागलं आहे. ग्रुप अ मध्ये सर्किट लागलेल्या शेअर्समध्ये IRFC आणि MMTC चा समावेश आहे.

एमएमटीसी शेअर आज ४४.१५ रुपयांवर खुला झाला आणि ५२.५० रुपयांचा उच्चांक गाठला. एमएमटीसीचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. ७,८८० कोटी रुपयांचं बाजार मूल्य असलेल्या ही कंपनी मागच्या सहा महिन्यांपासून तेजीच्या लाटेवर स्वार आहे. सहा महिन्यांपूर्वी हा शेअर ३१.३५ रुपयांवर होता. या कालावधीत त्यानं ६७.४६ टक्के इतका घसघशीत नफा मिळवून दिला. या वर्षी आतापर्यंत शेअरमध्ये ३६.३६ टक्के इतकी वाढ झाली आहे. बीएसईवर आताच्या घडीला हा शेअर ६२.७० रुपयांवर ट्रेड करत आहे.

LKP सिक्युरिटीजचे वरिष्ठ टेक्निकल अ‍ॅनालिस्ट रुपक डे यांनी यांनी एमएमटीसीच्या शेअरबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. डेली चार्ट हा शेअर मजबूत दिसत असल्याचं डे यांनी आज बाजार खुला होण्यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. याशिवाय शेअर सातत्यानं महत्त्वाच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या वर राहिला आहे. यातून त्याची ताकद दिसते, असं त्यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner