Redmi New 5G Smartphones: चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रेडमीने आपल्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त मिड-रेंज स्मार्टफोन रेडमी नोट १३ 5G सीरिज भारतात लाँच केली आहे, ज्यात रेडमी नोट १३, रेडमी नोट १३ प्रो आणि रेडमी नोट १३ प्रो प्लस अशा तीन मॉडल्सचा समावेश आहे.
नुकतेच लाँच झालेल्या रेडमी नोट १३ सीरिजच्या स्मार्टफोनची पहिली सेल येत्या १० जानेवारीपासून सुरु होईल. ग्राहक एमआय स्टोअर किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून या स्मार्टफोनची खरेदी करू शकतात.
रेडमी नोट १३ प्रो प्लस 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना २००० हजारांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच ओआयएससह २०० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईट आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो रिअर कॅमेरा मिळत आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी मिळत आहे, जे १२० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
रेडमी नोट १३ प्रो (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनची किंमत १३ हजार ९९९ पासून सुरू होते. या स्मार्टफोनच्या खेरदीवर ग्राहकांना बँक ऑफर्स देखील मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना २ हजारांची बचत करता येणार आहे. या फोनमध्ये प्रो प्लस मॉडेल सारखाच कॅमेरा आणि डिस्प्ले मिळत आहे. हा फोन कोरल पर्पल, आर्क्टिक व्हाईट आणि मिडनाइट ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी मिळत आहे.
रेडमी नोट १३ 5G (६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना १००० रुपयांची सूट दिली जात आहे. रेडमी नोट १३ प्रो प्लस 5G आणि रेडमी नोट १३ 5G प्रो तुलनेत रेडमी नोट १३ 5G स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात सुधारणा करण्यात आली. या फोनमध्ये ग्राहकांना १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी मिळत आहे, जे ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.