MG Cyberster Launch News : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्ये देश-विदेशातील एकापेक्षा एक कार आणि बाइकचे अनावरण सुरू आहे. याच मांदियाळीत जेएसडब्लू एमजी मोटर इंडियानं (JSW MG Motor India) नं आपली पहिली-वहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार सायबरस्टर लाँच केली आहे. अवघ्या ३.२ सेकंदात ही कार ताशी १०० किमी वेग पकडू शकते.
सायबरस्टार EV साठी मार्च २०२५ मध्ये बुकिंग सुरू होणार असून प्रत्यक्ष विक्री एप्रिलमध्ये सुरू होईल. एमजी सिलेक्ट प्रीमियम रिटेल नेटवर्कद्वारे या कारची विक्री केली जाणार आहे. ही सर्व-इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार CBU मार्गानं भारतात येईल.
सायबरस्टार ही कार डायनॅमिक रेड, इंका यलो, कॉस्मिक सिल्व्हर आणि इंग्लिश व्हाईट या एकूण ४ रंगांमध्ये उपलब्ध असेल. तर, डिझाईनच्या बाबतीत कारमध्ये फंक्शनल एअर व्हेंट्स, क्रोम-फिनिश्ड एमजी लोगो आणि एलईडी डीआरएलसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह हनीकॉम्ब पॅटर्नमध्ये एक मोठी काळ्या रंगाची ग्रील आहे. एमजी सायबरस्टर २० इंच ड्युअल-टोन अलॉय व्हीलवर चालते.
सायबरस्टारमध्ये १०.२५ इंचाची इंफोटेनमेंट सिस्टीम ७ इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह मिळते. हे इंस्ट्रूमेंट Android आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. याशिवाय, यात एसी कंट्रोलसह ८ स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम देखील आहे.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झाल्यास ही कार ७७ किलोवॅट बॅटरी पॅकसह ४५० किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. हे इंजिन सायबरस्टरला ३.२ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग वाढवण्यास मदत करते.
संबंधित बातम्या