MG Comet EV : अमेरिकेतील वाहन उत्पादक कंपनी एमजीने ४ मे रोजी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार काॅमेट ईव्ही भारतात लदाखल केली. आता याच काॅमेटचे दुसरे व्हर्जन दाखल करण्यात आले आहे. कंपनीने एमजी काॅमेट गेमर एडिशन स्पेशल दाखल केली आहे. भारतात या नव्या व्हेरियंटच्या खरेदीसाठी ६५ हजार रुपये अतिरिक्त भरावे लागतील. गेमर एडिशनला काॅमेटच्या तीन व्हेरियंट्समध्ये खरेदी करता येईल. ही गाडी भारतात अंदाजे ७.८९ लाख रुपयात खरेदी करता येणार आहे.
एमजी काॅमेट ईव्ही स्पेशल गेमर एडिशनला एमजीने भारतातील सर्वात मोठ्या गेमर माॅर्टल नावाने ओळखल्या जाणाऱ्या नमन माथूरसहित भागीदारीत लाँन्च केले अहे. स्पेशल गेमर एडिशनचे डिझाईन थोडेसे वेगळे आहे. त्याचे व्हील्स आणि बी पिलरवर वेगळ्या प्रकारचे डिझाईन केले आहे. इंटिरिअरमध्ये नियाॅन लाईट्स आणि त्याच्या चावीवर वेगळ्या प्रकारचे टेक्चर दिले आहे.
एमजी काॅमेट ईव्हीत १७.३ केव्हॅटचा बॅटरी पॅक मिळतो. त्याची ईलेक्ट्रिक मोटर ४१ बीएचपी पावर आणि ७६ एनएमचा टाॅर्क जनरेट करते. ही गाडी रियल रोड लाईफमध्ये १९१ किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. या माॅडेलची टक्कर टाटा टियागो आणि सिट्रोन ई सी ३ शी आहे. ॉ
या ईव्हीच्या टाॅप माॅडेलमध्ये चांगल्या प्रतिचा व्हाॅईस कमांड फिचर्स, टचस्क्रिन इन्फोटेंन्मेंटसहित अॅपल कारप्ले, अँड्राॅईड आॅटो कनेक्टिव्हिटी, पावर मिरर, पावर विंडो आणि डिजिटल इन्स्ट्रूमेंटल क्लस्टरसारख्या फिचर्सचा समावेश आहे.