MG Comet EV: एमजी मोटारची इलेक्ट्रीक कार जवळपास दीड लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवी किंमत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MG Comet EV: एमजी मोटारची इलेक्ट्रीक कार जवळपास दीड लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवी किंमत

MG Comet EV: एमजी मोटारची इलेक्ट्रीक कार जवळपास दीड लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवी किंमत

Updated Feb 14, 2024 10:29 AM IST

MG Comet EV Price Cut: एमजी मोटर इंडियाने एमजी कॉमेट ईव्हीच्या किंमतीत एक लाख ४० हजारांपर्यंत मोठी कपात केली आहे.

MG Comet EV
MG Comet EV

इलेक्ट्रिक कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाचीा बातमी आहे. ऑटोमोटिव्ह कंपनीने एमजी मोटार इंडियाने त्यांची इलेक्ट्रीक कार एमजी कॉमेट ईव्हीच्या किंमतीत ९९ हजारांपासून ते १ लाख ४० हजारांपर्यंत कपात केली आहे. तीन ट्रिम ऑप्शनमध्ये उपलब्ध असलेल्या एमजी कॉमेट ईव्हीची किंमत कपातीनंतर आता ६ लाख ९९ हजार ते ८ लाख ५८ हजार रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आली आहे.

एमजी कॉमेट ईव्हीच्या एंट्री लेव्हल पेस ट्रिमच्या किंमतीत ९९,००० रुपयांची कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे किंमत ७.९८ लाख रुपयांवरून ६.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे. मिड-लेव्हल प्ले आणि आलिशान ट्रिम्सच्या किंमतीत १.४० रुपयांची कपात करण्यात आली आहे. प्ले ट्रिमची एक्स-शोरूम किंमत ९ लाख २८ रुपयांऐवजी ७ लाख ८८ हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप लेव्हल लक्झरी ट्रिमची एक्स-शोरूम किंमत ९ लाख ९८ हजार इतकी होती. मात्र, आता ग्राहकांना ही कार ८ लाख ५८ हजारांत (एक्स- शोरुम) खरेदी करता येणार आहे

एसएआयसीच्या मालकीच्या ब्रिटीश कार ब्रँडने २०२४ मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीचा आकडा वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि वैयक्तिक गतिशीलतेची मागणी वाढत असताना हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात ही दरकपात करण्यात आली. विशेष म्हणजे, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स सारख्या अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचे कारण देत दरवाढीची घोषणा केली. परंतु, एमजी मोटर इंडियाने दरकपात केली आहे.

Kia Sonet vs Mahindra XUV300: किआ सोनेट की महिंद्रा एक्सयूव्ही 300? कोणती कार निवडावी? वाचा

एमजी कॉमेट ईव्हीमध्ये १७.३ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे छोटी इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर २३० किलोमीटरचे अंतर गाठेल.  बॅटरी पॅकमध्ये रियर एक्सलला सिंगल इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे, जी ४१ बीएचपी पीक पॉवर आणि ११० एनएम टॉर्क जनरेट करते.

एमजी झेडएस ईव्हीच्याही किंमतीत कपात

एमजीने आपल्या झेडएस ईव्हीमच्या किंमतीतही घट केली आहे. या कारच्या किंमतीत २ लाख ९० हजारांची कपात करण्यात आली आहे.एमजी झेडएस ईव्हीची किंमत कपातीनंतर आता १८.९८ लाख ते २४.९८ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Whats_app_banner