Meta Layoffs : मार्क झुकरबर्गच्या मेटामध्ये कामगार कपात! जगभरातील ३६०० कर्मचाऱ्यांना बसवणार घरी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Meta Layoffs : मार्क झुकरबर्गच्या मेटामध्ये कामगार कपात! जगभरातील ३६०० कर्मचाऱ्यांना बसवणार घरी

Meta Layoffs : मार्क झुकरबर्गच्या मेटामध्ये कामगार कपात! जगभरातील ३६०० कर्मचाऱ्यांना बसवणार घरी

Published Feb 13, 2025 08:19 AM IST

Meta Layoffs : मेटामध्ये कर्मचारी कपात सुरू करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये मेटाने ३६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची कंपनीने तयारी सुरू केली आहे.

मार्क झुकरबर्गच्या मेटामध्ये कामगार कपात! जगभरातील ३६०० कर्मचाऱ्यांना बसवणार घरी
मार्क झुकरबर्गच्या मेटामध्ये कामगार कपात! जगभरातील ३६०० कर्मचाऱ्यांना बसवणार घरी (AP)

 Meta Layoffs news : जगातील आघाडीची टेक कंपनी मेटा कामगार कपात करणार आहे. तब्बल ५ टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या निर्णयानुसार कंपनी युरोप, आशिया व अमेरिकेतील ३,६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी योग्य नाही व त्यांनी कंपनीच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही अशा कामगारांना काढून टाकले जाणार असल्याचं मेटाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बाबतचे वृत्त हे बिझनेस इनसायडरने दिले आहे.

मेटाच्या या निर्णयाचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आव्हान दिले आहे. कर्मचाऱ्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी कधीच नकारात्मक कामगिरी केलेली नाही. यात मेटावर्क्समधील माजी उत्पादन सल्लागार एलाना रेमन सॅफनर आहेत, ज्यांना कंपनीत तीन वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला कामावरून काढून टाकण्यात आले.

'मेटा'ने कर्मचाऱ्यांची संख्या पाच टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने नोकरकपात सुरू केली आहे. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, युरोप, आशिया आणि अमेरिकेतील सुमारे ३६०० कामगारांना या कपातीचा फटका बसणार आहे. ही कपात कामगिरीवर आधारित राहणार आहे. जे कर्मचारी अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत त्यांना काढून टाकले जाणार आहे. कंपनी आता काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन लोकांना नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने म्हटले आहे की, सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पाच टक्के कर्मचाऱ्यांवर होईल. सप्टेंबरपर्यंत मेटामध्ये सुमारे ७२,४०० कर्मचारी होते, आता त्यामध्ये मोठी घट होणार आहे.

अमेरिकेतील मेटाच्या कर्मचारी एलाना सफनर यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये मेटावर निशाणा साधत तिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय कामगिरीवर आधारित नसल्याचे म्हटले आहे. मार्क झुकेरबर्गच्या नव्या नोकर कपात धोरणामुळे मेटामधील तिच्या काळातील अनेक गोष्टी चुकवणार नाही, असा दावा तिने केला आहे.

 महिला कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल

नोकरीवरून काढल्यानंतर अमेरिकेतील एलाना रेमन सॅफनर यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये मेटावर टीका केली आणि दावा केला की त्यांना काढून टाकण्याचा निर्णय त्यांच्या कामगिरीवर आधारित नव्हता. सहा महिन्यांच्या प्रसूती रजेवरून परतल्यानंतर, काही आठवड्यांनी त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. असा दावा एलाना रेमन सॅफनर यांनी लिंक्डइनवर पोस्टमध्ये केला आहे.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner