Mercedes-Benz eqa Launched in India: मर्सिडीज-बेंझ इंडियाने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मर्सिडीज-बेंझ ईक्यूए भारतात लॉन्च केली आहे. मर्सिडीज-बेंझ ईक्यूए आता भारतातील ब्रँडची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे. मर्सिडीज-बेंझ ईक्यूए कंपनीच्या भारतीय ईव्ही लाइन-अपमध्ये अद्ययावत ईक्यूबी ७-सीटर एसयूव्ही, मोठी ईक्यूई एसयूव्ही आणि ईक्यूएस सेडानमध्ये सामील झाली आहे. मर्सिडीज-बेंझ ईक्यूएचे बुकिंग आजपासून सुरू झाले असून, जानेवारी २०२५ पासून त्याची डिलिव्हरी सुरू होणार आहे.
मर्सिडीज-बेंझ ईक्यूएमध्ये फ्रंट ग्रिल पॅनेलवर मर्सिडीजचा सिग्नेचर स्टार पॅटर्न मिळणार आहे. समोर लाइटबारसह क्रॉसओव्हरसारखी स्टाईल देण्यात आली आहे. याचे रिअर डिझाइन ईक्यूबीसारखे दिसते. मर्सिडीज बेंझ ईक्यूए पोलर व्हाईट, कॉसमॉस ब्लॅक, माउंटेन ग्रे, हायटेक सिल्व्हर, स्पेक्ट्रल ब्लू, पॅटागोनिया रेड मेटॅलिक आणि माउंटेन ग्रे मॅग्नो या सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. मर्सिडीज-बेंझ ईक्यूए कंपनीने लॉन्च केली असून त्याची किंमत ६६ लाख रुपये आहे. मर्सिडीज ईक्यूएची थेट टक्कर व्होल्वो एक्ससी ४० रिचार्ज आणि किया ईव्ही ६ सारख्या कारशी असेल.
इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये डॅशबोर्ड आणि डोर ट्रिम पीसवर एस-क्लास आणि ईक्यूएस सारखा बॅकलिट स्टार पॅटर्न आहे. दुसरीकडे मर्सिडीज-बेंझ ईक्यूएमध्ये क्युपर्टिनो लेदरेट अपहोल्स्ट्री स्टँडर्ड म्हणून देण्यात आली आहे. यात टच-कॅपेसिटिव्ह थ्री-स्पोक स्टीअरिंग व्हील, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हरडिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले, १०.२५ इंच टचस्क्रीन, ३६० डिग्री कॅमेरा आणि डॉल्बी अॅटमॉससह ७१० वॉट १२ स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. तर, सुरक्षेसाठी या कारमध्ये ७-एअरबॅग आणि एडीएएससारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर मर्सिडीज-बेंझ ईक्यूए मध्ये ७०.५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो फ्रंट-माउंटेड इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतो जो जास्तीत जास्त १९० एचपीपॉवर आणि ३८५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. ईव्ही ८.६ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास वेग पकडू शकते आणि त्याची टॉप स्पीड १६० किमी प्रति तास आहे. मर्सिडीज-बेंझ ईक्यूए सिंगल चार्जवर ५६० किमीपर्यंत रेंज देते. बॅटरी १०० किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंगला (३५ मिनिटांत १०-८० टक्के) सपोर्ट करते. ११ किलोवॅट एसी चार्जरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास ७ तास १५ मिनिटे लागतील.
संबंधित बातम्या