Mercedes-Benz GLC 2023 : मर्सिडिज बेंन्झ जीएलसीने लक्झुरी कार मार्केटमध्ये धमाका केला आहे. तीन आठवड्यांपूर्वी या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने आज ही गाडी भारतीय बाजारात लाँन्च केली. ही गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहक १.५० लाख रुपये टोकन रुपये देऊन नवीन एसयूव्हीचे बुकिंग करू शकतात. ही गाडी आँनलाईन स्टोअरमध्येही बुक केली जाऊ शकते कंपनीने याचे दोन व्हेरियंट्स बाजारात दाखल केले आहेत. एक जीएलसी ३०० ४ मॅटिग आणि दुसऱी जीएलसी २२० डी ४ मॅटिक.
न्यू जनरेशन जीएलसी एक फ्रेश आणि स्पोर्टी लूकमध्ये सादर करण्यात आली आहे. या गाडीचे नवे आणि स्लीक हेडलाईट्स, नवीन आयब्रो स्टाईल डे टाईम ड्रायव्हिंग लाईट्स, नवीन ट्रॅग्यूलर टेललाईट्समुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. नवीन फ्रंट आणि रिअर बंपर, नवीन फ्रंट डोअर माऊंटेड आऊटसाईड व्यू मिररमुळे रस्त्यावरची दृश्यमानता चांगली होते. या गाडीचे एलाॅय व्हील्स आणि ड्युएल एक्झाॅस्ट टीप्स कारचा एकूण लूक वाढवतात.
नवीन GLC कारची लांबी ४,७१६ मिमी, उंची १,६४० मिमी आणि रुंदी २,०७५ मिमी आहे. GLC च्या व्हीलबेसचा आकार वाढला आहे. तो २,८८८ मिमी करण्यात आला आहे. मर्सिडिजने पुढील आणि मागील ट्रॅकची रुंदी अनुक्रमे ६ मिमी आणि २३ मिमीने वाढवली आहे.
कारच्या इंटिरिअरवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. आतील भागात १२.३-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि बायोमेट्रिक आॅथेंटिकेशनसह ११.९ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सेटअप आहे. कारच्या आत नवीन स्टीयरिंग व्हील, नवीन सीट्स, सी-क्लास इंस्पायर्ड एअर कॉन वेट्स देण्यात आले आहेत. यात MBUX ट्रॅकपॅड, क्यूबी होल्डर आणि वायरलेस चार्जिंग पॅड आहे.
या कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, एलईडी हेडलाइट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ आहे. यात बर्मेस्टर सराउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, ६४ कलर्स अॅम्बियंट लाइटिंग आणि मल्टी-झोन क्लायमेंट कंट्रोल देखील मिळतात. यात एअरमॅटिक एअर सस्पेंशन आणि रियर-एक्सल स्टीयरिंग देखील मिळते. यामध्ये प्रोग्रेसिव्ह डिजिटल हेडलॅम्पचाही समावेश आहे.
मर्सिडीज एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. GLC ३०० मध्ये २.० लिटर इनलाइन फोर-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे ५,८०० आरपीएमवर २५८ पीएस पॉवर आणि २,००० आरपीएम आणि ३००० आरपीएम दरम्यान ४०० एनएम टॉर्क निर्माण करते.
दरम्यान नवीन जनरेशनची मर्सिडिज बेंन्झचा मुकाबला बीएमडब्ल्यू एक्स ३, आॅडी क्यू ३ आणि वोल्वो एक्स सी ४० शी होणार आहे.