मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Rupert Murdoch engagement: जगप्रसिद्ध उद्योजक रुपर्ट मरडॉक वयाच्या ९२ व्या वर्षी करणार पाचवं लग्न, कोण आहे होणारी बायको?

Rupert Murdoch engagement: जगप्रसिद्ध उद्योजक रुपर्ट मरडॉक वयाच्या ९२ व्या वर्षी करणार पाचवं लग्न, कोण आहे होणारी बायको?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 08, 2024 12:43 PM IST

Rupert Murdoch Engagement : मीडिया किंग अशी ओळख असलेले उद्योजक रुपर्ट मरडॉक हे वयाच्या ९२ व्या वर्षी पाचवं लग्न करणार आहेत. या लग्नाची जगभरात चर्चा आहे.

'मीडिया मुघल' रुपर्ट मरडॉक यांचा ९२ व्या वर्षी साखरपुडा, कोण आहे होणारी बायको?
'मीडिया मुघल' रुपर्ट मरडॉक यांचा ९२ व्या वर्षी साखरपुडा, कोण आहे होणारी बायको? (REUTERS)

Rupert Murdoch engagement news : 'मीडिया मुघल' म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध उद्योजक रुपर्ट मरडॉक हे वयाच्या ९२ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. प्रेयसी एलेना झुकोवासोबत (Elena Zhukova) नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. लवकर त्यांचं लग्न होणार असून मरडॉक यांचं हे पाचवं लग्न असेल.

एलेना झुकोवा आणि रूपर्ट मरडॉक यांचं लग्न कॅलिफोर्नियातील मर्डोक यांच्या मालकीच्या विनयार्ड एन्ड इस्टेट मोरागा इथं होणार आहे. ‘फॉक्स’ आणि ‘न्यूज कॉर्प’च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच मरडॉक आणि एलेना हे संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली होती.

तिसऱ्या पत्नीच्या माध्यमातून झाली एलेनाशी भेट

न्यूयॉर्क टाइम्सनं ही बातमी सर्वप्रथम दिली होती. एलेना झुकोवा ही रशियन असून मॉस्कोमध्ये राहते. ती ६७ वर्षांची आहे. ती निवृत्त आण्विक जीवशास्त्रज्ञ आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, त्यांची भेट मरडॉकची तिसरी पत्नी वेंडी डेंगच्या माध्यमातून झाली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या.

मरडॉकचा यांनी अलीकडंच अभिनेत्री आणि मॉडेल जेरी हॉलपासून घटस्फोट घेतला आहे. सहा वर्षे संसार केल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी काडीमोड घेतला. हॉल या त्याआधी रोलिंग स्टोन्स गायक मिक जॅगरसोबत दीर्घकाळ संबंधात होता.

याआधी मोडलं होतं लग्न

एलेनाशी साखरपुडा होण्याआधी, मागील वर्षी माजी सॅन फ्रान्सिस्को एन लेस्ली स्मिथ यांच्याशी मरडॉक यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, काही कारणामुळं त्यांच्यात दुरावा आला. टव्हॅनिटी फेअर'नं एका सूत्राचा हवाला देत या ब्रेकअपची माहिती दिली होती. स्मिथच्या कट्टर ख्रिश्चन विचारांमुळं मरडॉक अस्वस्थ होते.

कुठे होणार लग्न?

मरडॉक यांचं पाचवं लग्न एका खास ठिकाणी होणार आहे. याच ठिकाणी मरडॉक आणि वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी डिस्नेच्या 21st Century Fox च्या अधिग्रहणाबाबत प्रथम चर्चा केली होती. २०१९ मध्ये ७१ अब्ज डॉलरचा हा करार पूर्ण झाला होता.

WhatsApp channel

विभाग