MCON Rasayan : एमकाॅन रसायनचा IPO देतोय जबराट परतावा, ४० रुपयांच्या शेअर्सवर २५ रुपये नफा
MCON Rasayan : एमकाॅन रसायनच्या आयपीओचे ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम वाढून २५ रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या शेअर्सचे प्राईस बँड ४० रुपये आहे. एमकाॅन रसायनचे शेअर्स २० मार्च २०२३ ला एक्सेंजवर लिस्ट होणार आहेत.
MCON Rasayan : एमकाॅन रसायनच्या आयपीओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.. एमकाॅन रसायनचे आयपीओ ३८४.६४ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. कंपनीच्या आयपीओचा रिटेल कोटा ४५३.४१ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. तर दुसऱ्या कॅटेगरीचा कोटा ३०७.०९ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. हा आयपीओ ६ मार्च २०२३ ला सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता. १० मार्चपर्यंत खुला झाला होता. कंपनीच्या आयपीओचा प्राईस बँड ४० रुपये आहे. एमकाॅन रसायनच्या आयपीओलाही ग्रे बाजारातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
२५ रुपयांवर ग्रे मार्केटमधील प्रिमियम
एमकाॅन रसायनच्या आयपीओचे प्रिमियम ग्रे मार्केटमध्ये वाढून २५ रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या शेअर्सचा प्राईस बँड ४० रुपये आहे. एमकाॅन रसायनच्या शेअर्स २० मार्च २०२३ ला लिस्ट होतील. जर कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये २५ रुपये प्रमियमवर असतील तर प्रत्यक्षात शेअर्सचा भाव हा अंदाजे ६५ रुपयांच्या दरम्यान लिस्ट होऊ शकतो. याचाच अर्थ कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकांना पहिल्याच दिवशी ५० टक्के लिस्टिंग गेन मिळू शकतो.
३ हजार शेअर्सचा एक लाॅट
एमकाॅन रसायन (MCon Rasayan) च्या आयपीओचा प्राईस बँड ४० रुपये होता. रिटेल गुंतवणूकदार आयपीओमध्ये १ लाॅटसाठी अर्ज करु शकतात. आयपीओच्या एका लाॅटमध्ये ३००० शेअर्स आहेत. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना किमान १.२ लाख रुपये गुंतवावे लागले. आयपीओच्या आधी एमकाॅन रसायनमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा ९१.४५ टक्के होता.शेअर्स लिस्टिंगनंतर कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा अंदाजे ६६.६४ टक्के राहिल.एमकाॅन रसायन माॅर्डन बिल्डिंग मटेरियल्स आणि कन्स्ट्रक्शन केमिकल्सचे उत्पादन, विपणन आणि विक्री करते.
संबंधित बातम्या