
McDonald layoff : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीशी संबंधित चिंता अधिक गडद होताना दिसत आहे. दरम्यान, जागतिक फास्ट फूड चेन मॅकडोनाल्ड्सने आपली अमेरिकेतील कार्यालये तात्पुरती बंद केली आहेत कंपनीने आपल्या कॉर्पोरेट
कर्मचार्यांना इमेल पाठवला आहे. आगामी काळात कंपनीतून कर्मचाऱी कपात होऊ शकते असे संकेतही दिले आहेत.
कर्मचारी कपातीपूर्वी असाही प्रयोग
गेल्या आठवड्यात, शिकागोस्थित कंपनी मॅकडोनाल्डने आपल्या अमेरिकेतील कर्मचार्यांना आणि काही आंतरराष्ट्रीय कर्मचार्यांना सोमवार ते बुधवार रिमोट लोकेशनवरुन काम करण्यास सांगितले. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना स्टाफिंगसंदर्भातील निर्णय व्हच्युअल पद्धतीने सांगता येतील.
कंपनीने आपल्या कर्मचार्यांनी वेंडर्सना वैयक्तिकरित्या भेटू नका असे सांगितले आहे. ३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या व्यावसायिक सप्ताहात आम्ही कंपनी स्तरावर आणि कर्मचाऱ्यांसंदर्भात घेतलेला निर्णय जाहीर करु असे सांगितले आहे.
मॅकडोनल्ड्स जगभरात विविध कॉर्पोरेट विभागात अंदाजे १,५०,००० लोकांना रोजगार देते. कंपनीची ७० टक्के रेस्टॉरंट्स अमेरिकेबाहेर आहेत.
सीईओ म्हणतात…
आपल्या बर्गर चेनसाठी व्यावसायिक धोरणांतर्गत एप्रिलपर्यंत संपूर्ण काॅर्पोरटेट स्टाफिंग संदर्भात कठोर निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच कंपनीने जानेवारी महिन्यात केले होते.
कंपनीचे सीईओनेही जानेवारीत एका मुलाखतीत सांगितले होते की, वर्क फोर्स असेसमेंट्सद्वारे पैसे वाचवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. दरम्यान कर्मचारी कपातीनंतर किती पैसे वाचवण्याची योजना आहे अथवा किती टक्के कर्मचारी कपात कंपनी करणार आहे यासंदर्भात कोणतीही माहिती त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही.
संबंधित बातम्या
