Penny Stock : शेअरची किंमत अवघी २ रुपये आणि कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा; नंतर जे व्हायचं तेच झालं! वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock : शेअरची किंमत अवघी २ रुपये आणि कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा; नंतर जे व्हायचं तेच झालं! वाचा!

Penny Stock : शेअरची किंमत अवघी २ रुपये आणि कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा; नंतर जे व्हायचं तेच झालं! वाचा!

Jan 04, 2025 03:30 PM IST

Mayukh Dealtrade Bonus Issue News : एखाद्या शेअरची किंमत अवघी २ रुपये आहे आणि त्या कंपनीनं बोनस शेअर्सची घोषणा केली तर जे होईल, तेच मयुख डीलट्रेड कंपनीच्या बाबतीत सध्या सुरू आहे.

Penny Stock : दोन रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, कारण काय?
Penny Stock : दोन रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, कारण काय?

Stock Market Update : आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, ३ जानेवारी रोजी शेअर बाजारात पडझड सुरू असताना एका चिमुकल्या शेअर मोठी मागणी होती. मयुख डीलट्रेड लिमिटेडचा हा शेअर होता. हा शेअर खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. कंपनीनं केलेली बोनसची घोषणा हे त्यामागचं कारण होतं.

कंपनीनं नुकतीच शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी ३:५ या प्रमाणात बोनस शेअर्स देणार असून संचालक मंडळानं त्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच पात्र भागधारकांना एक रुपयाच्या अंकित मूल्याच्या प्रत्येक ५ समभागांमागे ३ शेअर्स मोफत मिळणार आहेत. बोनस इक्विटी शेअर्ससाठी पात्र भागधारक निश्चित करण्याच्या उद्देशानं शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

मयुख डीलट्रेड लिमिटेडमधील एकूण शेअर्सपैकी ३.११ टक्के हिस्सा प्रवर्तकांचा आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग ९६.८९ टक्के आहे. प्रवर्तकांपैकी रोशन डीलमार्क प्रायव्हेट लिमिटेडकडं ३६,८३,६०० शेअर्स म्हणजेच ३.०७ टक्के शेअर्स आहेत. 

काय करते कंपनी?

मयुख कमर्शिअल लिमिटेड अशी मूळ ओळख असलेली मयुख डीलट्रेड लिमिटेड मीडिया, स्टील आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सक्रिय आहे. ग्राहकोपयोगी आणि घरगुती वस्तू, पोलाद, माध्यमे आणि पायाभूत सुविधांमध्येही या कंपनीचा व्यवसाय आहे. ऑगस्ट १९८० मध्ये स्थापन झालेली ही कंपनी स्टीम वेपोरायझर, कापूर बर्नर, साड्या, कापूर दाणी अशा विविध उत्पादनांची विक्री करते.

कसे होते तिमाही निकाल?

सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत मयूख डीलट्रेड लिमिटेडची निव्वळ विक्री १.५६ कोटी रुपये होती. सप्टेंबर २०२३ तिमाहीतील ०.४६ कोटी रुपयांच्या तुलनेत हा आकडा २४०.१४ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचा निव्वळ नफा १२४.९ टक्क्यांनी वाढून ०.६२ कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर २०२४ तिमाहीत एबिटडा ०.९७ कोटी रुपये होता, जो सप्टेंबर २०२३ तिमाहीतील ०.४३ कोटी रुपयांच्या तुलनेत १२५.५८ टक्क्यांनी अधिक आहे.

शेअरचा आताचा भाव किती?

मयुख डीलट्रेडचा शेअर शुक्रवारी १० टक्क्यांनी वधारून २.३२ रुपयांवर पोहोचला. जानेवारी २०२४ मध्ये हा शेअर ३.७७ रुपयांवर गेला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता. तर जुलै २०२४ मध्ये शेअरचा भाव १.१९ रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner