Tata Punch EV: टाटा पंच ईव्हीवर ७०,००० रुपयांची सूट; जाणून घ्या फीचर्सपासून रेंजपर्यंत संपूर्ण माहिती
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Punch EV: टाटा पंच ईव्हीवर ७०,००० रुपयांची सूट; जाणून घ्या फीचर्सपासून रेंजपर्यंत संपूर्ण माहिती

Tata Punch EV: टाटा पंच ईव्हीवर ७०,००० रुपयांची सूट; जाणून घ्या फीचर्सपासून रेंजपर्यंत संपूर्ण माहिती

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 08, 2025 07:50 AM IST

Tata Punch EV Price Drop: टाटा मोटर्सच्या धांसू ईव्ही पंच इलेक्ट्रिकवर ग्राहकांना थेट ७० हजार रुपयांची सूट मिळत आहे.

टाटा पंच ईव्हीवर ७०,००० रुपयांची सूट
टाटा पंच ईव्हीवर ७०,००० रुपयांची सूट

Tata Punch EV Offers: भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. जर तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. खरे तर टाटाच्या धांसू ईव्ही पंच इलेक्ट्रिकवर ग्राहकांना थेट ७० हजार रुपये वाचवता येणार आहेत. दरम्यान, टाटा पंच ईव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंट आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टाटा पंच इलेक्ट्रिक: ऑफर्स

या दरम्यान टाटा पंच ईव्हीच्या एमवाय २०२४ वर सर्वाधिक सूट मिळत आहे. ऑटोकार इंडिया या न्यूज वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ग्राहकांना पंच ईव्ही एमवाय २०२४ वर ७० हजार रुपये वाचवण्याची संधी मिळत आहे. तर, एमवाय २०२५ वर ४० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. डिस्काऊंटबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक आपल्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात.

टाटा पंच इलेक्ट्रिक: रेंज

टाटा पंच ईव्हीमध्ये २ बॅटरी पॅक आहेत ज्याची रेंज ४०० किमीपेक्षा जास्त आहे. पहिली बॅटरी २५ किलोवॅट बॅटरीने सुसज्ज आहे जी जास्तीत जास्त ८२ बीएचपीपॉवर आणि ११४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरा ३५ किलोवॅट बॅटरीने सुसज्ज आहे, जो जास्तीत जास्त १२२ बीएचपीपॉवर आणि १९० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकतो. लहान बॅटरीवर चालणारे मॉडेल सिंगल चार्जवर ३१५ किमीची रेंज देते. तर, मोठी बॅटरी पॅक ४२१ किमीची रेंज देते.

टाटा पंच इलेक्ट्रिक: फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, पंच ईव्हीमध्ये १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एअर प्युरिफायर आणि सनरूफ देखील आहे. याशिवाय सुरक्षेसाठी कारमध्ये ६-एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि ३६० डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. टॉप मॉडेलमध्ये टाटा पंच ईव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपयांपासून १४.२९ लाख रुपयांपर्यंत जाते. 

डिस्क्लेमर: आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि स्त्रोतांच्या मदतीने कारवरील सूट सांगत आहोत. आपल्या शहरात किंवा डीलरवर कमी-अधिक सूट असू शकते. अशावेळी कार खरेदी करण्यापूर्वी डिस्काउंटशी संबंधित सर्व डिटेल्स जाणून घ्या.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner