OnePlus Smartphones: वनप्लसचा नवा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड ४ लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. हा फोन १६ जुलै रोजी बाजारात लॉन्च होणार आहे. यापूर्वी कंपनीने आपल्या जुन्या मॉडेल्सवर भरघोस सूट दिली. वनप्लस नॉर्ड ३ 5G ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अगदी स्वस्तात मिळत आहे. वनप्लस नॉर्ड ३ 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३३ हजार ९९९ रुपये आणि १६ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३७ हजार ९९९ रुपये होती. मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता हे फोन अगदी स्वस्ता खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली. आता फोन थेट १३००० रुपये स्वस्त होत आहे
वनप्लस नॉर्ड ३ ५ जीचा ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट (टेम्पेस्ट ग्रे) सध्या अॅमेझॉनवर फक्त २०,९९९ रुपये म्हणजेच फ्लॅट १३,००० रुपये कमी किंमतीत उपलब्ध आहे. फोनवर कोणतीही बँक ऑफर नाही पण जर तुमच्याकडे बदलण्यासाठी जुना फोन असेल तर तुम्ही त्याची किंमत कमी करू शकता. अॅमेझॉनच्या या फोनवर १८,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. तथापि, एक्सचेंज बोनसची किंमत आपल्या जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. तुमच्याकडे एक्स्चेंज करण्यासाठी जुना फोन नसला तरी १३ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट कमी नाही.
वनप्लसचा हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी ९००० चिपसेटने सुसज्ज आहे. फोन रॅम आणि स्टोरेजनुसार हा फोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये ६.७४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि एचडीआर १०+ सपोर्टसह येतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ओआयएससह ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ८९० सेन्सर, सोनी आयएमएक्स३५५ सेन्सरसह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ८० वॉट सुपरव्हीओसी चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी आहे. हा फोन आयपी ५४ रेटिंगसह येतो. फोनमध्ये ५जी, ४जी एलटीई, वायफाय ६, ब्लूटूथ ५.३, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत.
संबंधित बातम्या