Redmi Note 13 Pro 5G Price and Specs: भारतीय बाजारपेठेत चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचा खूप मोठा वाटा आहे. कंपनी प्रत्येक सेगमेंटमध्ये दमदार स्पेसिफिकेशनअसलेले फोन ऑफर करत आहे. दरम्यान, कंपनीचा २०० मेगाापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन रेडमी नोट १३ प्रो 5G अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफरसह इतर डिस्काउंट मिळणार आहेत.
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर रेडमी नोट १३ प्रो 5G साठी मर्यादित वेळेची डील दिली जात आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलमध्ये २०० मेगापिक्सलचाा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रेडमी नोट १३ प्रो 5G सवलतीसह खरेदी करा.
शाओमी स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर२४ हजार ९९९ रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची ही किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आणि इतर निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ३००० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट आणि केवळ २१ हजार ९९९ रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.
जुना फोन एक्सचेंज करताना ग्राहकांना नवीन डिव्हाइस खरेदी करायचे असेल तर 23,749 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. मात्र, त्याची किंमत जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा फोन आर्क्टिक व्हाईट, कोरल पर्पल, स्कार्लेट रेड आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
शाओमी फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन प्रदान करतो. या डिस्प्लेमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि १८००न्यूटनचा पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन ७ एस जेन २ प्रोसेसर आहे आणि बॅक पॅनेलवर २०० एमपी+ ८ एमपी+ २ एमपी ट्रिपल कॅमेरा मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ हजार १०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी ६७ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
संबंधित बातम्या