फास्ट प्रोसेसर असलेला गेमिंग फोन १४,९९९ रुपयांत उपलब्ध, १० मिनिट चार्ज करा अन् तासभर खेळा गेम!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  फास्ट प्रोसेसर असलेला गेमिंग फोन १४,९९९ रुपयांत उपलब्ध, १० मिनिट चार्ज करा अन् तासभर खेळा गेम!

फास्ट प्रोसेसर असलेला गेमिंग फोन १४,९९९ रुपयांत उपलब्ध, १० मिनिट चार्ज करा अन् तासभर खेळा गेम!

Dec 07, 2024 03:39 PM IST

Realme Sale: रियलमी आपल्या वेबसाईटवर खास सेल चालवत आहे. या सेलअंतर्गत रियलमी अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

रियलमी नार्झो ७० टर्बो 5G वर बंपर सूट!
रियलमी नार्झो ७० टर्बो 5G वर बंपर सूट!

Realme Narzo 70 Turbo 5G: चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी आपल्या वेबसाईटवर स्पेशल सेल सुरू आहे. हा सेल ८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये रियलमीचा लेटेस्ट फोन रियलमी नार्झो ७० टर्बो 5G वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. हा रियलमी फोन सर्वात वेगवान प्रोसेसरसह येणारा सर्वोत्कृष्ट गेमिंग फोन आहे. या फोनची डिझाईन मोटरसपोर्टपासून प्रेरित आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलएआय कॅमेरा आणि १२० हर्ट्झ आय कम्फर्ट डिस्प्ले देण्यात आला आहे. सेलमध्ये फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरियंटला अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या स्पेशल सेलमध्ये १५,००० रुपयांपेक्षा कमी मिळत आहे. चला जाणून घेऊया नार्झो ७० टर्बो ५ जी वरील ऑफर्स आणि डील्सबद्दल सविस्तर:

रियलमी नार्झो ७० टर्बो ५ जी चा ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट १६,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन रियलमीच्या साईटवर १००० रुपयांच्या डायरेक्ट डिस्काउंटवर लिस्ट करण्यात आला आहे. यासोबतच फोनवर १००० रुपयांचा कूपन डिस्काउंटही दिला जात आहे. त्यानंतर फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. फोनवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफर्सचा फायदा घेऊन अतिरिक्त सवलतही घेता येईल. टर्बो पर्पल, टर्बो ग्रीन आणि टर्बो यलो या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

रियलमी नार्झो ७० टर्बो 5G: डिस्प्ले

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, १० मिनिटांच्या चार्जिंगवर १.७ तासांचे गेम खेळता येतील. या 5जी स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे.

रियलमी नार्झो ७० टर्बो 5G: प्रोसेसर

फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० ५जी प्रोसेसर आहे. हा फोन अ‍ॅडव्हान्स ४ एनएम प्रोसेस टेक्नॉलॉजीवर काम करतो. रियलमीचा हा फोन स्टेनलेस स्टील वेपर चेंबर कूलिंगने सुसज्ज आहे. यात जीटी मोड देण्यात आला आहे.

रियलमी नार्झो ७० टर्बो 5G: कॅमेरा

फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, याचा मुख्य कॅमेरा ५० एमपी आणि दुसरा कॅमेरा २ एमपी पोर्ट्रेट कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Whats_app_banner