मारुती सुझुकीने नुकतेच स्विफ्टचे फोर्थ जनरेशनचे मॉडेल लाँच केले आहे. आता या आलिशान हॅचबॅक कारची सीएनजी मॉडेलही लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. मारुती सुझुकीची सीएनजी कार गुरुवारी (१२ सप्टेंबर) लॉंच होऊ शकते.
विशेष म्हणजे, नवीन स्विफ्ट सीएनजी अधिक चांगल्या मायलेजसह बाजारात आणली जाईल. ही कार भारतात खूप लोकप्रिय आहे आणि मारुती कारच्या विक्रीत तिचा मोठा वाटा आहे. नवीन स्विफ्ट आल्यानंतर कंपनी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये स्विफ्ट सीएनजी मोठी भूमिका बजावणार आहे.
भारतात, मारुती सुझुकी स्विफ्ट थेट टाटा टियागो आणि Hyundai Grand i10 Nios शी स्पर्धा करते. CNG मॉडेलच्या आगमनानंतर, स्विफ्ट CNG टाटा Tiago CNG आणि Hyundai Grand i10 Nios CNG शी स्पर्धा करेल.
चला तर मग जाणून घेऊया स्विफ्ट CNG मध्ये कोणते स्पेसिफिकेशन दिले जाऊ शकतात आणि ही कार किती मायलेज देईल.
स्विफ्टच्या CNG प्रकारात फक्त विद्यमान १.२ लिटर ३ सिलेंडर ड्युअलजेट मालिकेतील नॅच्युअरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते. तथापि, CNG मॉडेलची पॉवर पेट्रोल माॅडेलच्या तुलनेत थोडी कमी असेल. याशिवाय, सीएनजी मॉडेल केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह बाजारात लॉन्च केले जाऊ शकते.
मारुती सुझुकी स्विफ्टची सध्याची पेट्रोल मॅन्युअल आवृत्ती २४.८० kmpl चा मायलेज देते. तर, स्वयंचलित आवृत्तीचे मायलेज २५.७५ किमी प्रति लिटर आहे. स्विफ्टची सीएनजी आवृत्ती आली तर ३२ किमी प्रति किलो मायलेज मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, बाजारात सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारमध्ये स्विफ्ट सीएनजीचे नाव घेतले जाईल.
असे मानले जाते की मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजीची किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा सुमारे ९० हजार रुपये जास्त असेल. स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. मारुती सुझुकीने अद्याप स्विफ्ट सीएनजीच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, पण ही कार १२ सप्टेंबरला लॉंट होणे अपेक्षित आहे. म्हणजेच नवीन स्विफ्ट सीएनजी सणासुदीच्या काळात लॉन्च होऊ शकते.