Maruti Suzuki: मारुती सुझुकी आपल्या नेक्सा श्रेणीतील वाहनांवर ८७,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारावर जास्तीत जास्त ८७,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर, नेक्सा रिटेल नेटवर्कद्वारे विकल्या जाणाऱ्या इग्निस, बलेनो, सियाज, जिम्नी आणि एक्सएल ६ सारख्या इतर कारदेखील मार्च २०२४ मध्ये सवलतीसह उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी ग्रँड विटारावर ३०,००० पर्यंत कॅश डिस्काउंट आणि ५०,००० पर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. तसेच ही एसयूव्ही ७,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर्ससह उपलब्ध आहे. मात्र, एसयूव्हीच्या सीएनजी व्हेरियंटसाठी कोणतीही ऑफर उपलब्ध नाही.
मारुती सुझुकी बलेनोवर ५७,००० रुपयांपर्यंत फायदे मिळत आहेत. प्रीमियम हॅचबॅकवर ३५००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळेल. तर, ग्राहकांना १५००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळू शकेल. याशिवाय, पात्र ग्राहकांना ७००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर देखील दिली जात आहे. मारुती सुझुकी बलेनोच्या सीएनजी व्हेरियंटवर ही २५००० रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत, ज्यात १००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि १५००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
मारुती सुझुकी इग्निसवर ६२००० रुपयांपर्यंत फायदे देत आहे. मारुती सुझुकी इग्निसवर ४०,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, १५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ७,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर मिळत आहे. बलेनोस्थित क्रॉसओव्हर फ्रॉंक्स आणि एक्सएल६ एमपीव्ही वर अनुक्रमे २७,००० आणि २०,००० रुपयांपर्यंत फायदे मिळत आहेत.
मारुती सुझुकीची एकमेव मिड साइज सेडान सियाज ६०,००० रुपयांपर्यंत बेनिफिटसह उपलब्ध आहे. यात २५,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि २५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.
मारुती सुझुकी जिम्नी ही सर्वाधिक गाजलेली एसयूव्ही असूनही आजतागायत प्रभावी विक्री कामगिरी दाखवू शकलेली नाही. २०२३ मध्ये लॉन्च झालेल्या या एसयूव्हीची विक्री दर महिन्याला घसरत चालली आहे. मारुती सुझुकी आपल्या किरकोळ विक्रीला चालना देण्यासाठी जिम्नीवर ५३,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यात ५०००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि कॉर्पोरेट ऑफरमध्ये ३००० रुपयांपर्यंतचा समावेश आहे.
संबंधित बातम्या