Mark Zuckerberg : भारतातील सर्वाधिक वापरलं जाणाऱ्या सोशल नेटवर्किंग साइट्स फेसबुक व इन्स्टाग्राममध्ये मोठा बदल होणार आहे. फेसबुक (Facebook) व इंस्टाग्रामची (Instagram) मालकी असलेल्या मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली आहे. कंपनी आपला थर्ड-पार्टी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करून त्याच्याजागी 'कम्युनिटी नोट्स' नावाचा नवीन प्रोग्राम सुरूकरणार आहे. या प्रोग्रामद्वारे युजर्स स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. हा नवीन प्रोग्राम इलॉन मस्कच्या 'X' प्रमाणे काम करेल. या बदलाची सुरुवात अमेरिकेतून केली जाणार आहे.
मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी जाहीर केले की ते आपल्या फॅक्ट-चेकिंग प्रोग्रामच्या जागी 'कम्युनिटी नोट्स' प्रोग्राम आणत आहेत, जे एलन मस्क यांच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स, (पूर्वीचे ट्विटर) द्वारे वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामसारखे असेल. थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम रद्द करण्याची सुरुवात अमेरिकेपासून होईल.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा या सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की, तज्ञ फॅक्ट चेकर्सनी स्वत:चे पूर्वग्रह बाळगल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.
मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आम्ही फॅक्ट-चेकर्सपासून मुक्त होणार आहोत आणि त्यांच्या जागी एक्स (पूर्वीचे ट्विटर) सारख्या कम्युनिटी नोट्स वापरणार आहोत. ते पुढे म्हणाले की, “फॅक्ट चेकर्स केवळ राजकीयदृष्ट्या पक्षपाती आहेत आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासापेक्षा जास्त विश्वास गमावला आहे, विशेषत: अमेरिकेत.”
एका ब्लॉग पोस्टमध्ये, मेटाचे मुख्य ग्लोबल अफेअर्स ऑफिसर जोएल कपलान म्हणाले, "आम्ही एक्सवर हा दृष्टीकोन कार्य करताना पाहिला आहे, जिथे ते त्यांच्या समुदायाला पोस्ट संभाव्य भ्रामक, दिशाभूल करणारी आहे, याचा निर्णय युजर घेऊ शकतात. काही निवडक विषयांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णयही कंपनीने घे्तला आहे. दहशतवाद, अंमली पदार्थ आणि लैंगिक शोषण यासारख्या बेकायदेशीर आणि उच्च तीव्रतेच्या उल्लंघनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे करण्यात आले आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाषणाला प्राधान्य देण्याच्या दिशेने सांस्कृतिक घडामोडी झाल्यासारखे वाटत असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात मेटा आणि झुकेरबर्ग यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि कंपनीवर उदारमतवादाचे समर्थन केल्याचा आणि कंझर्व्हेटिव्ह लोकांबद्दल पूर्वग्रह बाळगल्याचा आरोप केला आहे.
संबंधित बातम्या