कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं गहाण ठेवले उपकंपनीचे ४० टक्के शेअर्स, कारण काय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं गहाण ठेवले उपकंपनीचे ४० टक्के शेअर्स, कारण काय?

कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं गहाण ठेवले उपकंपनीचे ४० टक्के शेअर्स, कारण काय?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 15, 2024 05:46 PM IST

mankind pharma share pledging : कंडोम बनविणाऱ्या मॅनकाइंड फार्मा या कंपनीनं आपल्या उपकंपनीचे जवळपास ४० टक्के शेअर गहाण ठेवले आहेत. काय आहे कारण? वाचा!

कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं गहाण ठेवले उपकंपनीचे ४० टक्के शेअर्स, कारण काय?
कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं गहाण ठेवले उपकंपनीचे ४० टक्के शेअर्स, कारण काय?

Stock Market Marathi News : मॅनकाइंड फार्मा लिमिटेडनं आपली उपकंपनी भारत सीरम अँड व्हॅक्सिन लिमिटेड (BSV) चे ३९.६८ टक्के गहाण ठेवले आहेत. कंपनीनं हे शेअर्स ५००० कोटी रुपयांच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरसाठी तारण ठेवले आहेत. सेबीच्या २०१५ च्या नियमांनुसार ही प्रक्रिया करण्यात आली आहे.

मॅनकाइंड फार्मा कंपनीचा शेअर गुरुवारी बीएसई २.९७ टक्क्यांच्या वाढीसह २६०६ रुपयांवर बंद झाला. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ५.५६ टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, त्यानंतरही २०२४ मध्ये कंपनीच्या शेअरच्या किमतीत ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभर हा शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत ४२ टक्क्यांहून अधिक फायदा झाला आहे.

मॅनकाइंड फार्माचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर २८८२.७५ रुपये आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १८२०.१५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?

सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ६५३ कोटी रुपये झाला आहे. एका वर्षात याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४७३ कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ३०७६.५१ कोटी रुपये राहिला आहे. जे वार्षिक आधारावर १३.६० टक्के अधिक आहे.

मॅनकाइंड फार्माचा आयपीओ २५ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान खुला होता. त्यानंतर आयपीओची किंमत १,०२६ ते १,०८० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच त्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १४२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner