मनबा फायनान्स लिमिटेडचा आयपीओ : नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) मनबा फायनान्स लिमिटेडचा आयपीओ येत आहे. या एनबीएफसीने प्राइस बँड जाहीर केला आहे. मनबा फायनान्स लिमिटेडच्या आयपीओसाठी प्राइस बँड ११४ ते १२० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. हा आयपीओ २० सप्टेंबररोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.
मनबा फायनान्स लिमिटेडच्या आयपीओचा आकार १५० कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून सव्वा कोटी नवे शेअर्स जारी करू शकते. आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतेही शेअर्स जारी केले जाणार नाहीत.
या आयपीओसाठी कंपनीने एकूण १२५ शेअर्स ची निर्मिती केली आहे. ज्यामुळे एका गुंतवणूकदाराला किमान १५ हजार रुपयांची बाजी लावावी लागत होती. मनबा फायनान्स लिमिटेड आयपीओमध्ये जास्तीत जास्त ५० टक्के, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी किमान ३५ टक्के आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी किमान १५ टक्के राखीव ठेवणार आहे.
आयपीओमधून मिळणारा पैसा कंपनीला भविष्यातील गरजांसाठी वापरायचा आहे. मनबा फायनान्स लिमिटेडची स्थापना १९९८ मध्ये झाली. कंपनी टू-व्हीलर, थ्री व्हीलर, इलेक्ट्रिक टू-व्हीलर, स्मॉल बिझनेस लोन आणि पर्सनल लोन देते.
31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या नफ्यात (कर भरल्यानंतर) 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, महसुलात वार्षिक आधारावर ४४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने हेम सिक्युरिटीज लिमिटेडची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. मनबा फायनान्स लिमिटेडच्या आयपीओच्या समभागांचे वाटप २६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. तर 30 सप्टेंबरला कंपनीची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.