Share Market News : स्टील पाईप उत्पादक कंपनी मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडला पाईप पुरवठ्याची तब्बल २५० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. येत्या ६ ते १२ महिन्यांत ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. नव्या ऑर्डरमुळं कंपनीची एकूण ऑर्डर बुक सुमारे २९०० कोटी रुपये झाली असून हा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर आला आहे.
गेल्या पाच वर्षांत मॅन इंडस्ट्रीज (इंडिया)चे समभाग ३८४ टक्क्यांनी वधारले आहेत. १४ फेब्रुवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर ५४.३५ रुपयांवर होता, तो आज २६३ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात मॅन इंडस्ट्रीज (इंडिया)च्या शेअरमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४०६ रुपयांवर होता, तो आज, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी २६३ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या काळात कंपनीचे समभाग ४५५ रुपयांवरून २६३ रुपयांवर आले आहेत. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १४.९४ टक्क्यांची घसरण झाली आहे.
दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांचा मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) मध्ये मोठा हिस्सा असून त्यांच्याकडं १३ लाख ६२ हजार ३९५ शेअर्स आहेत. आशिष कचोलिया यांचा कंपनीत २.०३ टक्के हिस्सा आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंगचा ही आकडेवारी डिसेंबर २०२४ तिमाहीपर्यंतची आहे.
संबंधित बातम्या