IPO Listing : पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागला होता का 'हा' आयपीओ?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागला होता का 'हा' आयपीओ?

IPO Listing : पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागला होता का 'हा' आयपीओ?

Dec 27, 2024 11:56 AM IST

Mamata Machinery IPO Listing News : ममता मशिनरीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरचा भाव इश्यू प्राइसपेक्षा १६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

IPO Listing : पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागला होता का 'हा' आयपीओ?
IPO Listing : पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागला होता का 'हा' आयपीओ?

Share Market News In Marathi : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला व गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद लाभलेला ममता मशिनरीचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीचा शेअर बीएसई आणि एनएसईवर १४६.९१ टक्क्यांच्या प्रीमियमवर ६०० रुपये प्रति शेअर दराने सूचीबद्ध झाला. लिस्टिंगनंतर शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. 

ममता मशिनरीच्या शेअरची आयपीओ किंमत २३० ते २४३ रुपये होती. शेअरची लिस्टिंग बीएसईवर ६२९.९५ रुपये आणि एनएसईवर ६३० रुपयांच्या पातळीवर झाली. इश्यू प्राइसपासून कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास १६० टक्क्यांनी वाढली आहे.

आयपीओचा तपशील

ममता मशिनरीचा आयपीओ १७९.३९ कोटी रुपयांचा होता. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ७४ लाख शेअर्स जारी केले होते. हे सर्व शेअर्स ऑफर फॉर सेलचा भाग होते. आयपीओ १९ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि २३ डिसेंबरपर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. एका लॉटमध्ये ६१ शेअर्सचा समावेश होता. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ८२३ रुपये मोजावे लागले. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर १२ रुपयांची सूट दिली होती.

ममता मशिनरीचा आयपीओ ३ दिवसांत १९४ पट सब्सक्राइब झाला. हा आयपीओ कर्मचारी श्रेणीत १५३ पट आणि किरकोळ श्रेणीत १३८ पट सब्सक्राइब करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ १८ डिसेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. त्यावेळी कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ५३.५६ कोटी रुपये जमा केले होते.

काय करते ही कंपनी?

एप्रिल १९७९ मध्ये स्थापन झालेली ममता मशिनरी ही कंपनी प्लास्टिक पिशव्या, पाउच, पॅकेजिंग आणि एक्सट्रूझन उपकरणे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचं उत्पादन आणि निर्यात करण्यात आघाडीवर आहे. कंपनी पॅकेजिंग उद्योगासाठी तयार केलेल्या उत्पादनांसाठी विविध प्रकारच्या सेवाही पुरवते. कंपनीनं ७५ देशांना आपली यंत्रे निर्यात केली आहेत. कंपनीचे युरोप, दक्षिण आफ्रिका आणि आशियामध्ये विक्री एजंट आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner