ममता मशिनरीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ममता मशिनरीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा!

ममता मशिनरीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा!

Dec 23, 2024 10:46 AM IST

Mamata Machinery IPO Subscription News : गेल्या आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला झालेला ममता मशिनरी कंपनीचा IPO आज सबस्क्रिप्शनसाठी बंद होणार आहे. आतापर्यंत कसा आहे या आयपीओला प्रतिसाद? किती आहे जीएमपी? जाणून घेऊया.

ममता मशिनरीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा!
ममता मशिनरीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा!

IPO Subscription News : शेअर बाजारात सध्या आयपीओंचा सुकाळ असून वर्ष संपता-संपता काही आयपीओ येत आहेत. ममता मशिनरी कंपनीचा आयपीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा आयपीओ सबस्क्राइब करण्याची आज शेवटची संधी आहे.

ममता मशिनरीच्या आयपीओच्या माध्यमातून १७९.३९ कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. मागील आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी खुला झालेला हा आयपीओ दोन दिवसांत ३७.३४ पट बुक करण्यात आला.

पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत ४.७४ पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत ४९.४५ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत या आयपीओला ५०.५५ पट सब्सक्रिप्शन मिळालं आहे. दरम्यान, कर्मचारी कोट्यातून ५३.९७ पट प्रतिसाद लाभला आहे.

हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल इश्यू आहे. आयपीओद्वारे कंपनीच्या प्रवर्तकांनी ०.७४ कोटी शेअर्स विक्रीस काढले आहेत. आयपीओसाठी किंमत पट्टा प्रति शेअर २३० आणि २४३ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

जीएमपी किती?

ममता मशिनरी आयपीओ जीएमपी जबरदस्त लिस्टिंगचे संकेत देत आहे. आज या शेअरचा जीएमपी २६० होता. हे पाहता शेअर बाजारात हा शेअर ५०३ रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो. २४३ रुपयांच्या प्राइस बँडच्या तुलनेत हा जीएमपी १०७ टक्के अधिक असल्याचे संकेत देतो.

कोण किती शेअर विकणार?

Beeline Capital Advisors Private Limited ही ममता मशिनरी IPO चे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे तर Link Intime India हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

आयपीओच्या माध्यमातून प्रवर्तक महेंद्र पटेल हे ५,३४,४८३ इक्विटी शेअर्स ऑफर करत आहेत. नयना पटेल १९,६७,९३१ इक्विटी समभागांची ऑफर देत आहे. भगवती पटेल १२,२७,०४२ इक्विटी शेअर्स विकणार आहेत. ममता ग्रुप कॉर्पोरेट सर्व्हिसेस LLP हे २१,२९,८१४ आणि ममता मॅनेजमेंट सर्व्हिसेस LLP १५,२३,०७० इक्विटी शेअर्स विकणार आहेत.

काय करते ही कंपनी?

एप्रिल १९७९ मध्ये स्थापन झालेली ममता मशिनरी ही कंपनी प्लास्टिक पिशव्या, पाउच, पॅकेजिंग आणि एक्सट्रूझन उपकरणे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचं उत्पादन आणि निर्यात करण्यात आघाडीवर आहे. कंपनी पॅकेजिंग उद्योगासाठी तयार केलेल्या उत्पादनांसाठी विविध प्रकारच्या सेवाही पुरवते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner