IPO Allotment News Today : ख्रिसमसच्या निमित्तानं उद्या, २५ डिसेंबर रोजी शेअर बाजार बंद असल्यानं आज अनेक कंपन्यांच्या आयपीओचं अलॉटमेंट होत आहे. त्यात ममता मशीनरी, ट्रान्सरेल लाइटिंग, कॉनकॉर्ड एन्व्हायरो, डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर्स आणि सनथन टेक्सटाइल्स या ५ आयपीओंचा समावेश आहे.
सनथन टेक्सटाइल्सचा आयपीओ वगळता इतर चार आयपीओंसाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना लिंक इनटाइम इंडियावर त्यांचं आयपीओ अलॉटमेंट स्टेटस पाहता येणार आहे. हे पाचही आयपीओ गुरुवारी, १९ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुले झाले होते आणि सोमवार, २३ डिसेंबर रोजी बंद झाले होते.
ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ लागला आहे, त्यांच्या डिमॅट खात्यात गुरुवारी शेअर जमा होतील. तर, ज्यांना शेअर अलॉट झाले नाहीत, त्यांच्या परताव्याची प्रक्रिया गुरुवार, २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे पाचही आयपीओ शुक्रवारी, २७ डिसेंबर रोजी बाजारात सूचीबद्ध होणार आहेत.
तुम्ही आयपीओ रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता. हा रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड / केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आहे. तसंच, पॅन कार्ड वापरून खाली दिल्याप्रमाणे अर्जाची आयपीओ अलॉटमेंट स्थिती तपासू शकता:
> आयपीओ रजिस्ट्रारची वेबसाइट पाहण्यासाठी https://linkintime.co.in/initial_offer/public-issues.html या लिंकला भेट द्या. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड https://kosmic.kfintech.com/ipostatus/ यावर जा.
> ड्रॉप-डाउन मेनूमधून आपण अर्ज केलेला आयपीओ निवडा. ममता मशीनरी आयपीओ, ट्रान्सरेल लाइटिंग आयपीओ, कॉनकॉर्ड एन्व्हायरो आयपीओ, डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर्स आयपीओ किंवा सनथन टेक्सटाइल्स आयपीओ.
> उपलब्ध निवडींमधून पॅन कार्ड पर्याय निवडा, ज्यात अर्ज क्रमांक, डीपी / क्लायंट आयडी आणि खाते क्रमांक / आयएफएससी समाविष्ट आहे.
> पॅन कार्ड नंबर टाका.
> आवश्यक असल्यास कॅप्चा प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
ममता मशिनरीचा आयपीओ जीएमपी आज +२६० आहे. आयपीओ प्राइस बँडचा वरचा टप्पा आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता ममता मशिनरीच्या शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत ५०३ रुपये असू शकते. ही किंमत २४३ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा १०७ टक्क्यांनी जास्त आहे.
investorgain.com नुसार, ट्रान्सरेल लाइटिंगचा ग्रे मार्केट प्रीमियम +१९२ आहे. आयपीओ प्राइस बँडचा वरचा टप्पा आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता, ट्रान्सरेल लाइटिंग शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत ६२४ रुपये असू शकते. ही किंमत ४३२ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा ४४.४४ टक्क्यांनी जास्त आहे.
डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सचा जीएमपी +१७० आहे. आयपीओ प्राइस बँडचा वरचा टप्पा आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता, डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सच्या शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत ४५३ रुपये असेल. ही किंमत २८३ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा ६०.०७ टक्के जास्त आहे.
सनथन टेक्सटाइल्स आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम +९० आहे. आयपीओ प्राइस बँडचा वरचा टप्पा आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता, सनथन टेक्सटाइल्सच्या शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत ४११ रुपये प्रति शेअर असू शकते. ही किंमत ३२१ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा २८.०४ टक्क्यांनी जास्त आहे.
कॉनकॉर्ड एन्व्हायरो सिस्टम्स आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम +७५ आहे. आयपीओ प्राइस बँडचा वरचा टप्पा आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता, कॉनकॉर्ड एन्व्हायरो सिस्टीम्सच्या शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत ७७६ रुपये असू शकते. ही किंमत ७०१ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा १०.७ टक्क्यांनी जास्त आहे.