मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mamaearth IPO : मामाअर्थचा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल, शिल्पा शेट्टी विकणार हिस्सा

Mamaearth IPO : मामाअर्थचा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल, शिल्पा शेट्टी विकणार हिस्सा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 18, 2023 07:21 PM IST

Mamaearth IPO : शार्क टँक फेम गझल अलघची कंपनी असलेल्या मामाअर्थने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे.

mamaearth_IPO_HT
mamaearth_IPO_HT

Mamaearth IPO : ब्युटी प्रोडक्ट ब्रँड मामाअर्थ ची मूळ कंपनी होनासा कन्झ्युमर तिचा आयपीओ आणणार आहे. कंपनीने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे.

ब्युटी प्रोडक्ट ब्रँड मामाअर्थ ची मूळ कंपनी होनासा कन्झ्युमर तिचा आयपीओ आणणार आहे. कंपनीने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे. कंपनीत भागभांडवल असलेली शिल्पा शेट्टी कुंद्रा आयपीओद्वारे आपला हिस्सा विकणार असल्याचे मानले जात आहे.

शिल्पा शेट्टी विकणार तिचा हिस्सा

होनासा कन्झ्युमर आयपीओमध्ये शेअर्सचे दर्शनी मूल्य १० रुपये प्रती शेअर्स असणार आहे. या आयपीओमधून कंपनी ४०० कोटी रुकंपनीचे प्रवर्तक वरुण अलघ ३१८६३०० शेअर्स आणि गझल अलघ ऑफर फॉर सेलमध्ये १ लाख शेअर्स विकणार आहेत. याशिवाय कुणाल बहल ७७७६७२ शेअर्स, ऋषभ हर्ष मारीवाला ४७७३०० शेअर्स, रोहित कुमार बन्सल ७७७६७२ शेअर्स आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा ५५४७०० शेअर्स आयपीओतून विकणार आहेत.

आयपीओतून उभारलेली रक्कम इथे खर्च करणार

कंपनी आयपीओमधील नव्या इश्यूमधून उभारलेल्या रकमेपैकी १८६ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करणार आहे. यासह, भांडवली खर्चाच्या शीर्षकाखाली ३४.२३ कोटी रुपये आणि बीब्लंट या उपकंपनीमध्ये २७.५२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मामाअर्थचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील. कंपनीने आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स, जेएम फायनान्शियल आणि जेपी मॉर्गन यांची नियुक्ती केली आहे.

शार्क टँक इंडिया शोपासूनच आयपीओची चर्चा

मामाअर्थची प्रवर्तक गझल अलघने सोनी टीव्हीच्या शार्क टँक इंडिया या स्टार्टअप शोमध्ये जज म्हणून भाग घेतला होता आणि ती खूप चर्चेत आली होती. मात्र, 2 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या शोच्या नव्या सीझनमध्ये ती दिसणार नाही.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग